बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांनी सांगितलं इंधन दरवाढीचं कारण, म्हणाले…

नवी दिल्ली | गेल्या दोन वर्षापासून कोरोनानं डोकं वर काढलेलं आहे. या कोरोना काळात अनेकांना बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागला. यातच आता देशभरात पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनाला भिडले आहे. वाढत्या महागाईचा सामना करावा लागत असल्यानं आणि कोरोनाचं संकट घोंगावत असल्यानं सामान्य नागरिकांच्या चिंतेत आणखी भर पडली आहे.

पेट्रोल आणि डिझेल या इंधनांच्या किमतीत सतत वाढ होत असल्यानं नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. अशातच आता वाढत्या इंधन दराविषयी केंद्रीय पेट्रोलियम मंत्री रामेश्वर तेली यांनी अजब स्पष्टीकरण दिलं आहे. त्यांच्या या वक्तव्यानं सध्या सगळ्याचंच लक्ष वेधून घेतलं आहे.

वाढत्या इंधन दराचं खापर रामेश्वर तेली यांनी लसीकरणावर फोडलं आहे. रामेश्वर तेली यांनी इंधन दरवाढीविषयी बोलताना म्हटलं की, देशात लसीकरण मोफत असल्यानं पेट्रोल, डिझेलचे दर वाढले आहेत.

दरम्यान, आज इंधनाच्या किंमतीत कोणतेही बदल झालेले नाहीत. राजधानी दिल्लीमध्ये आज पेट्रोल 104.44 रुपये प्रति लीटर आहे, तर डिझेल 93.18 रुपये प्रति लीटर आहे. काल पेट्रोलच्या किंमतीत 30 पैसे प्रति लीटर आणि डिझेलच्या दरात 35 पैशांनी वाढ झाली होती.

थोडक्यात बातम्या – 

राज्यातील चित्रपटगृहे, नाट्यगृहे उघडण्याचा मुहूर्त अखेर ठरला; ‘ही’ असणार नवी नियमावली

IPL 2021: पराभवानंतर विराट कोहलीला अश्रू अनावर, पाहा भावूक व्हिडीओ

सरकार ‘या’ कर्मचाऱ्यांना देणार पदोन्नती; पगारातही होणार घसघशीत वाढ

नरेंद्र मोदींचा नवीन मास्टर प्लॅन; उद्या लाँच करणार ‘ही’ जबरदस्त योजना

वानखेडे आणि कंबोज यांची भेट तर…; नवाब मलिकांचा नवा गौप्यस्फोट

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More