बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

रहाटणीतील ‘लेगसी ऑरा’ चा अनोखा पर्यावरणस्नेही गणेशोत्सव!

पुणे | पर्यावरणस्नेही गणेशोत्सव ही गेल्या काही वर्षांपासून चर्चेत असलेली संकल्पना आता शहरांतील सोसायट्यांमध्ये देखील बऱ्यापैकी रुजलेली दिसून येत आहे. पिंपरी चिंचवडमधील रहाटणी येथील लेगसी ऑरा सोसायटीने या दिशेने पाऊल टाकत या वर्षी गणरायाच्या स्वागतासाठी एक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवला आहे. सोसाटीच्या गणेश मंडळाने पर्यावरण पूरक आकर्षक देखावा करून एक चांगले उदाहरण सादर केले आहे.

गणरायाच्या दोन्ही बाजूंना मोराच्या कागदी प्रतिकृती उभारण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे या प्रतिकृती संपूर्णपणे कागदापासून बनवलेल्या आहेत. गणेश चतुर्थीच्या अगोदर दोन तीन दिवसांपासून सोसायटीच्या सभासदांनी हा देखावा सादर करण्यासाठी परिश्रम घेतले. हा देखावा सादर करण्यासाठी विशाल वाघेला, किरण देवरे, डॉ. राहुल सोनवणे, विजय गायकवाड, राहुल बेंडाळे, योगेश पवार, श्रीकांत कोल्हे, सागर मिटकरी, ओम कदम, गिरीराज तारू, सुरेश पोला, सुधीर कमतारीया आणि सागर कदम यांचे विशेष योगदान लाभले.

दरम्यान सोसायटीच्या गणेशोत्सव मंडळाकडून सभासदांसाठी आणि लहान मुलांसाठी समाज प्रबोधनपर कार्यक्रम राबविण्यात आले. हे सर्व उपक्रम राबवत असताना शासनाने घालून दिलेल्या सर्व नियमांचे पालन करण्यात आले. गणपती विसर्जनदेखील पिंपरी चिंचवड महानगपालिकेने उभारलेल्या विसर्जन हौदात करण्यात येणार आहे. याआधी देखील लेगसी ऑरा सोसायटीकडून विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले आहेत.

गेल्यावर्षी कोरोनामुळे लागलेल्या लॉकडाऊनमध्ये सोसायटीमध्ये भाजीपाला विक्रीचा उपक्रम राबवणारी पिंपरी चिंचवडमधील पहिली सोसायटी होण्याचा मान लेगसी ऑराला मिळाला होता.

थोडक्यात बातम्या- 

पुण्यात बिग बास्केट कंपनीला भीषण आग; सर्व साहित्य जळून खाक

राज्यातील ‘या’ भागात मुसळधार पावसाची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज

“मुंबई हे महिलांसाठी जगातील अत्यंत सुरक्षित शहर आहे”

“उद्धव ठाकरेंना शिवसेनेच्या इज्जतीचा लिलाव करण्याची हौस आहे”

“श्रेय स्वत:ला घ्यायचं आणि दोष दुसऱ्याला द्यायचा हाच मोदींचा मंत्र”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More