बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

विद्यार्थ्यांच्या पुर्नपरीक्षेची विनंती विद्यापीठाने फेटाळली, तब्बल 9 हजार विद्यार्थी होणार नापास

नागपूर | नागपूरच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील तब्बल 9 हजारांहून अधिक विद्यार्थी नापास होणार असल्याची माहिती समोर येत आहे. कोरोना महामारीच्या संकटात सर्वच विद्यापीठांच्या परीक्षा या ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येत आहेत. नागपूर विद्यापीठातही ऑनलाइन पद्धतीने परीक्षा घेण्यात आल्या.

विद्यापीठाच्या परीक्षा देत असताना तांत्रिक अडचणीमुळे परीक्षेत अडथळा निर्माण झाल्यास किंवा परीक्षा देता न आल्यास विद्यापीठ अशा विद्यार्थ्यांची पुर्नपरीक्षा घेते. त्यासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज करून समाधानकारक कारण देऊन पुर्नपरीक्षेस पात्र होता येते. अशाच तब्बल 09 हजार 429 विद्यार्थ्यांनी विद्यापीठात पुर्नपरीक्षेची विनंती केली होती.

नागपूर विद्यापीठाने या विद्यार्थ्यांची मागणी फेटाळून लावत दिलेली कारणं समाधानकारक नसल्याचे सांगत आणि पुरेसा वेळ मिळूनही परीक्षा न दिल्याने विद्यार्थी पुर्नपरीक्षेस पात्र नाहीत, असं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे आता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील 9 हजार 429 विद्यार्थी नापास होणार आहेत.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक प्रफुल्ल साबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्यार्थ्यांना पुरेसा वेळ मिळूनही त्यांनी परीक्षा दिली नाही. शिवाय पुर्नपरीक्षेस अर्ज करताना विद्यार्थ्यांनी दिलेली कारणंही समाधानकारक नसल्याने त्यांना अपात्र ठरविण्यात आलं असून त्यांचा अर्ज फेटाळला आहे. ऑनलाइन परीक्षांमुळे परीक्षा या पारदर्शकपणे होत नसल्याचं बोललं जात होतं. त्यातच आता 9 हजारांहून अधिक विद्यार्थी नापास होणार असल्याने यात नेमकी कोणाची चूक? ते तपासणं महत्वाचं आहे.

थोडक्यात बातम्या

देशात दीड हजारांच्या जवळपास डॉक्टरांचा कोरोनामुळे मृत्यू; मृतांमध्ये इंटर्न डॉक्टरांचाही समावेश

“मोदी सरकारमुळेच मुंबई तुंबली अन् हिंदमाता येथे पाणी साचलंय त्याला स्मृती इराणी जबाबदार”

चिंता वाढली! ‘या’ जिल्ह्यात एका दिवसात तब्बल 24 कोरोनाबाधितांचा मृत्यू

भाजपमधील कोणालाही उत्तर देणं मी रास्त समजत नाही- खासदार संभाजीराजे

पुढील तीन तास मुंबईसाठी धोक्याचे; हवामान विभागाचा सतर्कतेचा इशारा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More