बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पुतिन यांच्या मुलींविरोधात अमेरिकेने उचललं ‘हे’ मोठं पाऊल

नवी दिल्ली | रशिया-युक्रेन युद्ध (Russia-Ukraine War) सुरू होऊन आता 40 दिवसांपेक्षाही जास्त कालावधी उलटून गेला आहे. युक्रेनमधील (Ukraine) परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत असताना रशियाने (Russia) युक्रेनवरील हल्ले अधिक तीव्र केले आहेत.

रशियाने युक्रेनवर सैन्य कारवाईचे आदेश दिल्यानंतर अमेरिकेसह (America) अनेक युरोपीयन देशांनी रशियावर आर्थिक निर्बंध लादले. मात्र, बुचा येथील धक्कादायक घटनेनंतर अमेरिकेने रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांच्या मुलींविरोधात मोठं पाऊल उचललं आहे.

अमेरिकेने पुतिन यांच्या दोन्ही मुलींवर आर्थिक निर्बंध लादले आहेत. पुतिन यांच्या मारिया वोरोंत्सोवा आणि कातेरिना तिखोनोव्हा या दोन मुलींवर अमेरिकेने आर्थिक निर्बंध लादले आहेत. पुतिन यांची बहुतांश संपत्ती त्यांच्या कुटुंबीयांकडे आहे. त्यामुळेच अमेरिकेने पुतिन यांच्या कुटुंबीयांवर निर्बंध लादल्याचं अमेरिकेतील एका अधिकाऱ्याने स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, अमेरिकेने पुतिन यांच्या मुलींशिवाय रशियातील अनेक बड्या नेत्यांवर, बँक आणि व्यावसायिकांवर निर्बंध लादले आहेत. रशियाच्या सर्वोच्च खासगी बँकांवर देखील अमेरिकेने निर्बंध लादले आहेत. त्यामुळे या बँका आता अमेरिकेत गुंतवणूक करू शकत नाही. रशियाने हे युद्ध थांबवावं यासाठी अमेरिकेकडून रशियाची आर्थिक कोंडी करण्याचे प्रयत्न सुरू आहे.

थोडक्यात बातम्या-

काळजी घ्या! महाराष्ट्रासाठी पुढचे काही दिवस महत्त्वाचे, ‘या’ भागात उष्णतेची लाट येणार

मोठी बातमी! किरीट सोमय्यांविरोधात गुन्हा दाखल

शिवसेना नेते संजय राऊतांना बोलण्यापासून रोखलं; राऊतांचा केंद्रावर हल्लाबोल

भारतात कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटची एन्ट्री; मुंबईत आढळला पहिला रूग्ण

शरद पवार यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे 10 मुद्दे, वाचा सविस्तर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More