बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘मानवतेचा इतका पुळका असेल तर…’; सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेचा जो बायडन यांच्यावर हल्लाबोल

मुंबई | भारताने आता 18 वर्षांवरील सर्वांनाच लस देण्याची घोषणा केली आहे. पण कोरोनाविरोधी लस तयार करण्यासाठी जो कच्चा माल लागतो त्याच्या निर्यातीवर अमेरिकेने बंदी घातली आहे. यावरून कोरोनासारख्या जागतिक संकटकाळात अमेरिकेची ही मानवता हरवली कुठे?, असा सवाल सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेने केला आहे.

अधिकाधिक लोकांचे प्राण वाचावे, यासाठी भारताने आता 18 वर्षांवरील सर्वांनाच लस देण्याची घोषणा केली आहे. लसीकरणाचा हा कार्यक्रम किंवा उत्सव यशस्वीपणे राबवण्यासाठी लसींच्या उत्पादनाचा वेग वाढणंही तितकंच आवश्यक आहे. मात्र कोरोना प्रतिबंधक लसींच्या कच्च्या मालावर निर्यातबंदी लादून अमेरिकेने आढेबाजीचा जो अमानुषपणा चालविला आहे तो संतापजनक आहे. ‘युनो’सारख्या संघटनेने व मानवतेची चाड असणाऱ्या सर्वच देशांनी या माणुसकीशून्य धोरणाचा जाब अमेरिकेला विचारायलाच हवा!, असं या अग्रलेखातून म्हटलं आहे.

कोरोनाविरोधी लस तयार करण्यासाठी जो कच्चा माल लागतो त्याच्या निर्यातीवर अमेरिकेने बंदी घातली आहे. ज्या कच्च्या मालाच्या पुरवठय़ामुळे कोरोनाशी दोन हात करणाऱ्या लसींचे उत्पादन होणार आहे आणि ज्या लसींमुळे हजारो-लाखो नव्हे तर कोटय़वधी लोकांचे प्राण वाचण्यास मदत होणार आहे त्या लस उत्पादनाला आणि पर्यायाने लसीकरणाला ब्रेक लागावा असे पाऊल अमेरिकेने उचलावे हेच मुळात अनाकलनीय आहे, असं म्हणत शिवसेनेनं अग्रलेखातून संताप व्यक्त केला आहे.

दरम्यान, लसीकरणाचा हा कार्यक्रम किंवा उत्सव यशस्वीपणे राबवण्यासाठी लसींच्या उत्पादनाचा वेग वाढणंही तितकंच आवश्यक आहे. मात्र कोरोना प्रतिबंधक लसींच्या कच्च्या मालावर निर्यातबंदी लादून अमेरिकेने आढेबाजीचा जो अमानुषपणा चालवला आहे तो संतापजनक आहे, असंही सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या-

राज्यातील ‘या’ भागात पुढील चार दिवस पावसाची शक्यता!

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फ्रंटलाईन वर्कर्ससाठी ठाकरे सरकारचा मोठा निर्णय!

‘हवं तर हात जोडतो, पण…’; राजेश टोपेंची जनतेला कळकळीची विनंती

“देश भयानक परिस्थितीशी झुंजतोय, देशाला नव्या संसद भवनाची नाही तर…”

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणातील सर्व महत्त्वाचे मुद्दे एकाच ठिकाणी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More