वजन कमी करण्यासाठी कांद्याचा असाही उपयोग!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

नवी दिल्ली | हल्ली वाढलेलं वजन (weight) ही एक मोठी समस्या ठरत आहेत. अनेकजण वाढलेलं वजन कमी करण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी ट्राय करत असतात. डायट, जीम यांसारख्या गोष्टी ट्राय करतात. अनेक घरगुती उपायांनीदेखील वजन कमी होण्यास मदत होते.

आपल्या रोजच्या जेवणात वापरण्यात येणाऱ्या कांद्याचा(Onion) उपयोग तुम्ही तुमचं वजन कमी करण्यासाठी करु शकता. कांद्याच्या रसात अनेक औषधी गुणधर्म असतात. हेच गुणधर्म वजन कमी करण्यासाठी मदत करतात. कांद्याच्या रसामध्ये अँटिऑक्सिडंट्स(Antioxidants), जीवनसत्त्व (Vitamins) आणि अनेक खनिजे आढळतात.

काद्यांच्या रसात असणारं फ्लेव्होनाॅइड (flavonoid) शरीरात चरबी (Fat) जमा होऊ देत नाही आणि वजन कमी करण्यास मदत करतं. कांद्याच्या सेवनानं लठ्ठपणा दूर होतो. अनेक आजार बरं करण्याचं काम कांदा करतो. कांद्यामध्ये कॅलरीचं प्रमाण कमी असतं. यामध्ये एकूण 64 कॅलरी (calories) असतात.

कांद्याचा रस (Onion juice) वजन कमी करण्यासाठी लाभदायक आहे. कांदामिक्सरमध्ये बारीक करुन त्यांमध्ये मीठ आणि लिंबू मिसळून प्या. कांद्याचं सूप (Onion soup) देखील बनवू शकता. कांद्याचे तुकडे करुन ते पाण्यात उकळून घ्या. त्यानंतर मात्र त्यांत काळे मीठ टाकून प्या. सलाड (Salad) मध्येदेखील तुम्ही कांद्याचा उपयोग करु शकता. कच्चा कांदा खाल्ल्यानेदेखील वजन कमी होण्यास मदत होते.

महत्त्वाच्या बातम्या