बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

Omicron: ओमिक्रॉनवर लस कधी बनणार?, आली ‘ही’ माहिती समोर

नवी दिल्ली | देशात आता कुठे कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याने दिलासादायक चित्र निर्माण झालं होतं. त्यातच आता कोरोनाच्या नवीन व्हेरियंट ओमिक्रॉनने (Omicron Varient) डोकं वर काढलं आहे. कोरोनाच्या जुन्या व्हेरियंटपेक्षा ओमिक्रॉन व्हेरियंट हा 5 पट अधिक वेगाने पसरत असल्याची माहिती आहे. त्यामुळे पुन्हा एकदा देशासमोरची चिंता वाढली आहे. त्यातच या व्हायरसला रोखायचं कसं? यासाठी प्रशासनाने तयारी सुरु केली आहे.

ओमिक्रॉनची भीती वाढत असल्याने बऱ्याच देशांनी प्रतिबंधक उपाय राबवायला सुरुवात केली आहे. आता ओमिक्रॉनवरील लशीसंबधित अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यातच आता फार्मा कंपनी मॉडर्ना इंकनने याबाबत एक महत्त्वाची माहिती दिली आहे. ‘2022 पर्यंत ओमिक्रॉनवरील लस बनवली जाऊ शकते,’ अशी माहिती फार्मा कंपनी मॉर्डनाने दिली आहे.

आतापर्यंत 14 देशात ओमिक्रॉनचे रुग्ण आढळले आहेत. दक्षिण आफ्रिकेमध्ये सर्वात प्रथम 24 नोव्हेंबरला ओमिक्रॉनचा रुग्ण आढळला होता. त्याचबरोबर ओमिक्रॉन हा व्हेरीयंट कोरोनापेक्षा अधिक भीषण असल्याने कोरोनावरील लसीचा त्याच्यावर परिणाम होत नसल्याचं सांगण्यात आलं आहे. त्यामुळे सर्व जगासमोर सध्या ओमिक्रॉन व्हेरियंटची भिती निर्माण झाली आहे.

दरम्यान, भारतातही दक्षिण आफ्रिकेतून आलेला 1 तरुण कोरोना पॉझिटीव्ह आढळल्याने चिंता वाढली होती. मात्र संबंधित रूग्णाच्या शरिरात नवा ओमिक्राॅन व्हेरिएंट आहे की नाही याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही, तसेच त्या रुग्णाचे नमुने जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले आहेत.

थोडक्यात बातम्या-

शिवसेनेला मोठा धक्का; ‘हा’ बडा नेता राष्ट्रवादीच्या वाटेवर

‘ट्विट करा आणि पैसे कमवा’; जाणून घ्या ट्विटरचं ‘हे’ नवं फिचर

मोदी सरकारच्या काळात भारतीयांची परदेशाकडे ओढ; ‘इतके’ लाख नागरिक परदेशात स्थायिक

गॅस सिलेंडर पुन्हा महागला, बसणार एवढ्या रुपयांचा फटका

“कोरोना हे मोदींच्या विरोधातलं षडयंत्र होतं, जे मेले त्यांना डॉक्टरांनीच मारलं”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More