मास्कच्या कारवाईसाठी गाडी थांबवली, तरुणाच्या कृतीनं पोलीसच पळू लागला, पाहा व्हिडीओ
रत्नागिरी | रत्नागिरी शहरात एका वाहतूक पोलिसाने एका युवकाला गाडीवरून जाताना मास्क नसल्यामुळे थांबवलं आणि तो युवक त्या पोलिसावरच भारी पडला. सध्या त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. गाडीवरून जाणाऱ्या युवकाने व्हिडिओ काढून मास्कबद्दल होणाऱ्या कारवाईचं वास्तव समोर आणल्यानंतर त्या पोलिसाने तिथून पळ काढला.
सध्या महाराष्ट्रात कोरोनाची संख्या वाढत असल्यामुळे प्रशासन कठोर पाऊले उचलत आहे. याच पार्श्वभूमीवर वाहतूक पोलिसांना मास्क नसलेल्या नागरिकांना दंड करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पण याचा गैरफायदा काही कर्मचारी घेत असल्याचं पाहायला मिळत आहे. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
व्हिडिओमधील युवक बोलतोय की, माझा मास्क नाही म्हणून त्यासाठी तुम्ही दंड घेणार, पण तुमचा मास्क आत्ता खाली होता, त्याच्याबद्दल काय? मी हेल्मेट घातल्यामुळे गाडीवर मास्क घातला नव्हता. असं या युवकाने सांगितलं पण तुम्ही कर्तव्य बजावत असतानाही मास्क घालत नाही. फक्त जनतेला नाहक त्रास देण्यासाठी आणि पैसे उकळण्यासाठी पोलिस कारवाई करत आहेत. असा आरोप त्या युवकाने वाहतूक पोलिसावर केला. या वाहतूक पोलिसाचं नाव शिवराम करंबेळे असल्याचं कळत आहे.
काही वेळ चाललेल्या या वादानंतर पोलिसाने तिथून पळ काढण्याचा निर्णय घेतला आणि कारवाई करून पावती देण्यास नकार देत ऑफिसला येऊन पावती घेऊन जा असं त्या युवकाला सांगितलं. पण तो युवकही मागे हटला नाही. तर, मी इथे दंड भरणार तर मला तुम्ही त्याची पावती पण इथेच द्या असा आग्रह त्याने धरला. त्यानंतर सदरील पोलिसाने तिथून पळ काढण्याचा पर्याय निवडला आणि तो वाहतूक विभागाच्या कार्यालयात येऊन भेटा असं म्हणत तिथून पळून जाऊ लागला. अधिकारांचा गैरवापर काही कर्मचारी करत असल्याचं स्पष्टं होत आहे, त्यामुळे प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचं बोललं जात आहे.
पाहा व्हिडिओ –
थोडक्यात बातम्या –
अवघ्या 12 वर्षांच्या बहिणीसोबत सख्या भावाने केलं ‘हे’ दुष्कृत्य; बहीण-भावाच्या नात्याला काळीमा!
मद्यप्राशन केलेल्या तरुणीचा भररस्त्यात राडा; हटकणाऱ्या पोलिसांची धरली काॅलर, पाहा व्हिडीओ
महापौर मुरलीधर मोहोळांनी लागु केले पुण्यात नवे निर्बंध; नागरिकांची साथ कमी पडल्यास लॉकडाऊन होणार!
महेश मोतेवारने दगडूशेठला अर्पण केलेला ‘तो’ सव्वा किलो सोन्याचा हार ‘सीआयडी’च्या ताब्यात
सचिन वाझेंनी वापरलेल्या ‘त्या’ मर्सिडीज गाडीत सापडलं नोटा मोजण्याचं मशीन आणि…
Comments are closed.