बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पुण्याला PM केअर फंडातून मिळालेले व्हेंटिलेटर निघाले खराब; अधिकाऱ्याने अजित पवारांकडे केली तक्रार

पुणे | पुण्यात कोरोना रूग्णांची संख्या वाढतच चालली आहे. वाढत्या कोरोनामुळे पुण्यात कोरोना लस, व्हेंटिलेटर्स, रेमडेसिवीर या तीन गोष्टींची मोठी कमतरता भासत आहे. अशात एक धक्कादायक बाब समोर आली आहे.

पीएम केअर फंडातून मिळालेले 58 व्हेंटिलेटर खराब निघाल्याचं कळतंय. याबाबत ससून रुग्णालयाचे डिन डॉ. मुरलीधर तांबे यांनी पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे आढावा बैठकीत तक्रार केली आहे. पीएम केअर फंडातून मिळालेले व्हेंटिलेटर सारखे बंद पडतात, व्हेंटिलेटर पूर्ण क्षमतेनं चालत नसल्याने धूळ खात पडून आहेत, अशी तक्रार डॉ. मुरलीधर तांबे यांनी केली आहे.

काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही कालच एक पत्रक काढत केंद्र सरकार दुजाभाव करत असल्याची टीका केली आहे. महाराष्ट्राला फक्त लसी देण्यातच नाही तर कोरोना काळात महत्वाची वैद्यकीय उपकरणे देण्यातसुद्धा केंद्र सरकारने दुजाभाव केला आहे, अशी टीका चव्हाण यांनी केलीये.

दरम्यान, लोकसभेतील आकडेवारीनुसार गुजरात आणि उत्तर प्रदेश राज्यात रुग्णसंख्येच्या व्यस्त पटीने N95 मास्क, पीपीई किट्स आणि व्हेंटीलेटर्स केंद्र सरकारने दिले आहेत, असा घणाघाती आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.

थोडक्यात बातम्या- 

“प्रकाश जावडेकर दिल्लीत बसुन जे ज्ञानामृत देत आहेत त्याची महाराष्ट्राला गरज नाही”

पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत मनसेचा राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा!

धक्कादायक! महाराष्ट्रातील ‘या’ शहरांमध्ये एकही व्हेंटीलेटर बेड शिल्लक नाही

“उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात लॉकडाऊन केला तर काय कराल?”

त्याने भररस्त्यात तिच्यावर 25 वेळा चाकूनं केले वार; दिल्लीतील घटनेनं देश हादरला, पाहा व्हिडीओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More