गुवाहाटी | शिवसेना नेते आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे महाविकास आघाडी सरकार सोबत बंड करुन 40 ते 50 आमदारांच्या गटाला घेऊन सूरत मार्गे गुवाहाटीला गेले. तिथून त्यांनी महाविकास आघाडी सरकारपुढे काही मागण्या ठेवल्या. त्या उद्धव ठाकरे यांनी फेटाळल्या.
आता शिंदेंचा एक व्हिडीओ व्हायरल होत असून त्यात ते दारुच्या नशेत दिसत आहेत, अशी सगळीकडे चर्चा सुरु आहे. त्यांना नीट उभं ही राहाता येत नाही आहे तसेच ते बोलण्याच्या देखील अवस्थेत नाही आहेत.
हा व्हिडीओ समाज माध्यमांवर पसरत असून सर्वच स्तरांतून चर्चा होत आहे. सेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी देखील या व्हिडीओवरुन एकनाथ शिंदे यांची नक्कल करत जोरदार टिका केली.
सदर व्हिडीओ हा 30 सेकंदांचा असून काॅंग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून तो व्हायरल केला जातो आहे. हा व्हिडीओ पाहून शिंदे दारुच्या नशेत होते का? असा प्रश्न विचारला जातोय. एकनाथ शिंदे यांच्यसह शिवसेनेचे बंडखोर आमदार सूरत विमानतळावरुन गुवाहाटीला जात होते. बसमधून शिंदे आणि सर्व आमदार उतरल्यानंतर पत्रकारांनी त्यांना घेराव घातला. त्यावेळी शिंदे कॅमेऱ्यात कैद झालेत.
थोडक्यात बातम्या –
‘आता तर ते दिसतही नाहीत’; बंडाची आठवण करून देत आदित्य ठाकरेंचा राज ठाकरेंना टोला
“देवा लवकर आटप रे सगळं, हॉटेलचं बिल वाढतंय”
“…पण त्यांनी शिवसैनिकांच्या आईवर हात घातला आहे, ते कसे शांत राहातील”
‘आधी नाथ होते आता दास झालेत’, मुख्यमंत्र्यांची खोचक टीका
मोठी बातमी! शिवसेनेला धक्का, शिंदे गटाचे नाव ठरले
Comments are closed.