बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

हाच खरा बाहुबली! डोक्यावर दुचाकी उचलणाऱ्या तरूणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल

मुंबई | आपण सर्वांनी बाहुबली चित्रपटामध्ये पाहिल असेल अभिनेता प्रभास एका सीनमध्ये शंकराची पिंड आपल्या खांद्यावर घेतो. तो सीन पाहिल्यावर खरंच प्रभासने साकारलेली ‘बाहुबली’चं पात्र नावाप्रमाणे दिसलं. मात्र तो चित्रपटातला बाहुबली झाला परंतू आपल्याकडे खरा बाहुबली पाहायला मिळाला आहे. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

त्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, एका माणसाने बाहुबलीसारखी आपल्या खांद्यावर गाडी उचलली आहे. विशेष म्हणजे त्याने गाडी फक्त उचलली नाही तर गाडी घेऊन तो चालताना दिसत आहे. तो जिथुन चालत आहे तिथे मोठे-मोठे दगड आणि मोठा खड्डा आहे.

दुचाकी असली तरी कमीत-कमी त्या गाडीचं वजन हे 100 किलोच्या आसपास असेल. 100 किलो वजन त्यासोबत बॅलन्स करून गाडीला खांद्यावर घेऊन त्या खडबडीत रस्त्यावरून चालणं हे दिसतंय तितकं सोप्प नाही. त्यामुळे चित्रपटात तरी प्रभासने खरोखरी जरी शंकराची पिंड उचलली नसली तरी या माणसाने आपली खरोखर दुचाकी उचलली आहे.

दरम्यान, सोशल मीडियावर नेटकरीही हा व्हिडीओ पाहून हैराण झाले आहेत. या व्हिडीओबाबत कोणतीही माहिती समजू शकलेली नाही की हा व्हिडीओ कुठला आहे, व्हिडीओमधील व्यक्ती नेमकी कोण आहे.

थोडक्यात बातम्या-

दिलासादायक! मुंबईची वाटचाल कोरोनामुक्तीकडे, वाचा आजची आकडेवारी

‘एवढी सगळी लफडी केलीस पण मला कळू दिलं नाहीस’; शिल्पा शेट्टी राजवर भडकली

‘राज्यपालपदावर असताना राजकारणाची एवढीच खुमखुमी असेल तर…’; नाना पटोलेंची राज्यपालांवर टीका

आनंदाची बातमी! पुण्यातील नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय घट, वाचा आजची आकडेवारी

मोठी बातमी! पूराचा फटका बसलेल्या महाराष्ट्रासाठी केंद्राकडून 701 कोटींची मदत जाहीर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More