बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

स्टेडियममध्ये सामना बघताना तरूणी पकडायला गेली चेंडू तितक्यात…; व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल!

मंबई | सोशल मीडियावर सामना चालू असताना प्रेक्षकांमधील अनेक व्हायरल व्हिडीओ पाहिले असतील. काही व्हिडीओमध्ये प्रेक्षकांमध्ये आलेला चेंडू पकडताना त्यांचा गेलेला तोल, काहीवेळी त्यांच्या खाद्य पदार्थात गेलेला चेंडू अशा प्रकारचे अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. अशाच प्रकारे एका सामन्यातील चेंडू पकडतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

व्हिडीओमध्ये ती तरूणी मित्रांसोबत बेसबॉलचा सामना बघायला आली होती. तिच्याकडे चेंडू येतो आणि तो चेंडू ती पकडायला जाते. ती खुप आनंदी होऊन हात पुढे करते मात्र तितक्यात एक लहान मुलगा तो चेंडू पकडतो आणि तिची फजिती होते.

यानंतर तिच्या बाजूला बसलेल्या मित्रांनाही हसू आवरलं नाही. तिची मजा घेताना दिसत आहेत तर एक मित्र तिला धीर देताना व्हिडीओमध्ये दिसत आहे. कारण तो चेंडू जेव्हा तरूणीकडे येत असतो तेव्हा ती चेंडू पकडण्यासाठी खूप उत्साही दिसते. मात्र तिला निराशा येते आणि कारण ठरतो तो लहान मुलगा.

दरम्यान, तरूणीच्या फजितीचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून व्हिडिओला नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर काहींनी ‘बहुत गजब बेज्जती हो गई यार’,’ ‘वाह बेटे मौज कर दी’, अशा पद्धतीच्या मजेशीर कमेंट्सही केल्या आहेत.

थोडक्यात बातम्या-

खळबळजनक! मंत्रालयात सापडला दारूच्या बाटल्यांचा खच

आयुर्वेदाचार्य योगगुरू बालाजी तांबे यांचं निधन

धक्कादायक! आता कोरोनापेक्षाही धोकादायक ‘या’ विषाणूचा शिरकाव

सर्वोच्च न्यायालयाचा राजकीय पक्षांना दणका, उमेदवारांचं गुन्हेगारी रेकाॅर्ड प्रसिध्द करण्याचा अवधी अवघा…

सुखद धक्का! नीरज चोप्राच्या सन्मानार्थ घेण्यात आला ‘हा’ ऐतिहासिक निर्णय

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More