देश

गावकऱ्यांनी मोठ्या आनंदाने शिक्षकाला दिला निरोप, व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल

आंध्र प्रदेश | सोशल मीडियावर एका गावातील एका आर्दश शिक्षकाच्या निरोप समारंभाचा व्हीडाओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हीडिओ आयएएस अधिकारी डॅा. एम.व्ही. राव यांनी ट्विटरवर शेअर केला आहे.

आंध्र प्रदेश येथील विजयनगरम जिह्ल्यातील गुम्मा लक्ष्मीपुरम या गावात मल्लूगुडा सरकारी शाळेतील शिक्षक नरेंद्र गोवडू यांची बदली झाली. त्यानंतर या गावातील लोकांनी शिक्षक नरेंद्र गोवडू यांचा निरोप समारंभ मोठ्या उत्साहात आणि अनोख्या पद्धताने केला आहे.

गावातील लोकांनी निरोप समारंभादिवशी नरेंद्र गोवडू यांचे पाय धुतले आणि लोकांनी त्यांना खांद्यावर बसवून पारंपारिक परंपरेने नृत्य करत निरोप दिला आहे.

निरोप समारंभाचा हा व्हीडिओ सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असुन आत्तापर्यंत या व्हीडिओला 600 हुन अधिक लाईक्स मिळाले आहेत.

 

थोडक्यात बातम्या-

‘भाजपनं आधीच सुधीर मुनगंटीवारांकडं जबाबदारी दिली असती तर…”

भाजप हा बलात्काऱ्यांचा पक्ष असं चित्रा वाघच म्हणाल्या होत्या- रूपाली चाकणकर

“…तर मग देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री का होऊ दिलं नाही?”

…अन् पाणी समजून त्या सरकारी अधिकाऱ्यानं प्यायलं सॅनिटायझर!

…अन्यथा 40 लाख ट्रॅक्टर रस्त्यावर उतरवणार; शेतकरी नेत्याचा मोदींना इशारा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या