बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

युद्धजन्य परिस्थितीतही चिमुरड्यांकडून एकमेकांवरील निस्वार्थ प्रेम, पाहा व्हिडीओ

काबुल | जगात सध्या तालिबान्यांनी बंदुकीच्या जीवावर अफगाणिस्तानवर वर्चस्व मिळवलं आहे. अफगाणिस्तानमधील लोकशाही पूर्णपणे संपुष्टात येऊन देश तालिबान्यांच्या हातात गेला आहे. अफगाणिस्तानचे राष्ट्रपती आश्रफ घाणी यांनी देशाबाहेर पलायन केलं आहे. अफगाणी नागरिक जीव वाचवण्यासाठी देशाबाहेर पडत आहेत. तालिबान्यांनी देशात इस्लामी शरिया कायदा लागू केला आहे.

भारतातील काही नागरिक अफगाणिस्तानात अडकले आहेत. त्या नागरिकांना वाचवण्यासाठी भारताचे मदत कार्य सुरू आहे. या मदतीचा भाग म्हणून भारतीय वायु दलाचं विमान भारतीय नागरिकांना घेऊन आलं आहे. या 168 नागरिकांमध्ये एका कुटूबांत लहान बहीण भाऊ सुद्धा होते. त्या दोघांचा व्हिडीओ समाज माध्यमांमध्ये प्रचंड प्रसिद्ध होत आहे.

या व्हिडीओमध्ये एक आई आपल्या मुलांना घेऊन बसलेली दिसत आहे. त्या व्हिडीओमध्ये लहान मुलाची बहिण आपल्या भावाचे मुके घेत असल्याचं दिसत आहे. तीने मुके घेतल्यावर ती आपल्या भावाला मुके घ्यायला लावत आहे. आपल्या आजुबाजूला युद्धजन्य परिस्थिती असताना सुद्दा या लहान चिमुकल्यांच्या निस्वार्थ प्रेमाचा व्हिडीओ पाहून जगण्याच्या आशा पल्लवीत होत आहेत.

भारतीय वायु दलाचं विमान गाझियाबादमध्ये दाखल झालं आहे. अफगाणिस्तानची राजधानी काबुलवरून 168 नागरिकांना आणण्यात आलं आहे. या 168 नागरिकांमध्ये 107 भारतीय नागरिक आहेत. भारतीय वायुदलाच्या सी – 17 या ग्लोबमास्टर विमानाने आणण्यात आलं आहे. आतापर्यंत 390 भारतीयांना मायदेशी आणलं आहे. पण, अद्याप अजून अनेक नागरिक अफगाणिस्तानात अडकले आहेत.

 

 

थोडक्यात बातम्या – 

“तिसरी लाट येण्याची शक्यता खूप कमी, आलीच तर…”

लसीकरणात महाराष्ट्राचा नवा विक्रम, एकाच दिवशी ‘इतक्या’ लाख लोकांचं लसीकरण

महाविकास आघाडीमध्ये खळबळ; काॅंग्रेस नेत्याने काँग्रेसच्याच मंत्र्यावर केला गंभीर आरोप

यशोमती ठाकूर यांचा अजित पवारांवर गंभीर आरोप, सुप्रिया सुळे म्हणतात…

मंत्रालयाबाहेर आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या शेतकऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More