बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

प्रतिक्षा संपली, रणबीर-आलियाचं ‘केसरीया’ गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई | अयान मुखर्जी दिग्दर्शित ब्रम्हास्त्र (Brahmastra) या चित्रपटातील बहुचर्चित गाणं अखेर प्रदर्शित झालं आहे. केसरीया हे गाण प्रेक्षकांच्या भेटीला आज आलं आहे. या गाण्याची पहिली झलक रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या लग्नापूर्वी शेयर करण्यात आली होती. या गाण्याचा होईल त्या पद्धतीने वापर चाहते करत होते. मग ते रील्स असो की व्हिडीओ असो.

हे गाणं प्रीतने संगीतबद्ध केलं आहे आणि तरूणाईचा लाडका गायक अरिजीत सिंगने(Arijit Singh) गायलेलं आहे. दरम्यान, गाण्याच्या पोस्टसोबत आलियाने कॅप्शनमध्ये लिहिले की, “आमच्या प्रेमाचा आवाज, आता तुमचा केसरिया आऊट झाला आहे!”

सोनी म्युझिक इंडिया या युट्युब(Youtube) चॅनलवर हे गांण काही वेळापूर्वीच प्रदर्शित झाल आहे. 1 तासात या गाण्याला 1 लाखापेक्षा जास्त (1,554,040) views गेले आहेत. तर चार हजारपेक्षा जास्त लाईक आले आहेत. हे गाणं शेअर होताच लोक वेडे झाले आणि ट्विटरवर त्यांच्या प्रतिक्रियांचा वर्षाव सुरू झाला आहे.

चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर ‘ब्रह्मास्त्र’ हा चित्रपट 9 सप्टेंबर 2022 रोजी हिंदी, तमिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नड (kannad) या 5 भारतीय भाषांमध्ये थिएटरमध्ये प्रदर्शित होईल. अभिनेते अमिताभ बच्चन, मौनी रॉय आणि नागार्जुन अक्किनेनी हे देखील या चित्रपटाचा एक भाग आहेत.

पाहा व्हिडीओ-

थोडक्यात बातम्या

ठाकरे-शिंदेंच्या भेटीवर संजय राऊतांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

जगदीप धनखड यांना उपराष्ट्रपतीपदासाठी उमेदवारी देण्यामागे भाजपची ‘ही’ मोठी खेळी?

सुष्मितासोबतच्या नात्याची कबूली दिल्यानंतर ललित मोदी ‘या’ कारणामुळे माध्यमांवर संतापले, म्हणाले..

‘हे बरोबर नाही’, कतरिनाच्या वाढदिवशी नेटकरी विकीवर संतापले

मुख्यमंत्रीपदासाठी बाशिंग बांधून बसलेले नवज्योतसिंग सिद्धू तुरुंगात क्लार्क, दलेर मेंहदीही साथीला

संजय राऊतांनी गजनी सिनेमा पहावा, आशिष शेलारांचा खोचक सल्ला

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More