बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

फक्त ‘या गोष्टीवर’ बंदी आणा; वानखेडे दांपत्याची न्यायालयात धाव

मुंबई | आर्यन खान ड्रग्ज प्रकरणापासून (Aryan Khan Drugs Case) एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे चांगलेच चर्चेत आले. सोशल मीडियाच्या माध्यमातून समीर वानखेडे आणि त्यांच्या कुटुंबीयांविरोधात अनेक खळबळजनक खुलासे व आरोप करण्यात आले. या सर्व प्रकरणानंतर समीर वानखेडे (Sameer Wankhede) व त्यांची पत्नी क्रांती रेडकरने (Kranti Redkar) न्यायालयात धाव घेतली आहे.

वानखेडेंविरोधात समाज माध्यमांवर (Social Media) पसरणाऱ्या खोट्या आणि द्वेषयुक्त वक्तव्यावर कायमची मनाई करण्यात यावी, अशी याचिका वानखेडे दांपत्याने मुंबईतील दिंडोशी दिवाणी सत्र न्यायालयात दाखल केली आहे. तर त्यांच्याविरोधातील मजकूर पसरवणाऱ्यांची खाती बंद करण्याची मागणीही या याचिकेत करण्यात आली आहे.

सर्वसामान्यांपासून ते राजकीय नेत्यांपर्यत अनेकांनी समीर वानखेडे आणि त्यांच्या कुटुंबीयांविरोधात अनेक दावे आणि टीका केली. याचेच पडसाद सोशल मीडियावर पाहायला मिळाले. इंस्टाग्राम (Instagram), ट्विटर (Twitter) सारख्या मीडिया प्लॅटफॉर्मवर वानखेडेंविरोधात टीका टीप्पणीसह त्यांना जीवे मारण्याची धमकी देखील देण्यात आली.

दरम्यान, सोशल मीडिया हँडल कोणत्याही निर्बंधाशिवाय काम करत असल्याचा आरोपही वानखेडेंनी या याचिकेत केला आहे. वानखेडेंनी दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणी 17 डिसेंबर रोजी पार पडणार आहे. सोशल मडिया कंपन्यांनी अशा प्रकारच्या निराधार पोस्ट करण्यापासून रोखावं, अशी मागणीही या याचिकेत करण्यात आली आहे.

थोडक्यात बातम्या-

“धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून ताबडतोब काढून टाका”

पतीला गर्लफ्रेंडसोबत असताना पत्नीनं रंगेहाथ पकडलं; पत्नीनं भररस्त्यात दोघांना…

राज्यभरातील शाळा सुरु करण्यासंदर्भात अजित पवारांनी दिली महत्त्वाची माहिती

अण्णा भाऊ साठे आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांमध्ये मला काहीही फरक दिसत नाही- मोहन भागवत

कोरोना लसीचा दुसरा डोस न घेतलेल्यांना अजित पवारांचा इशारा, म्हणाले…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More