बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“आमच्या पंतप्रधानांनी 700 कोटी पाठवले, तुमच्या मुख्यमंत्र्यांनी काय दिवे लावले ?”

मुंबई | 22 जुलैपासून झालेल्या पावसामुळे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली होती. सातारा, सांगली, कोल्हापूर,रत्नागिरी, रायगड आणि ठाणे या जिल्ह्यात पूराने थैमान घातलं होतं. त्यानंतर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, राज्यपाल आणि पक्षाच्या नेत्यांनी देखील नुकसानग्रस्त भागाचे दौरे केले. त्यानंतर केंद्र सरकारने मागील वर्षी झालेल्या नुकसानीची मदत राज्याला पाठवली आहे. त्यावरून आता नितेश राणे आणि विजय वडेट्टीवार यांच्यात वाकयुद्धाला सुरूवात झाली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राणे साहेबांना पाहणी करण्याची परवानगी दिली. त्यापद्धतीनं राणे आले. त्यांच्यासोबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर देखील होते. त्यांनी केंद्रात माहिती पाठवल्याप्रमाणे केंद्राने तातडीनं 700 कोटीची मदत पाठवली. आमच्या पंतप्रधानांनी 700 कोटी पाठवले, तुमच्या मुख्यमंत्र्यांनी काय दिवे लावले ?, असा सवाल नितेश राणे यांनी उपस्थित केला आहे.

स्वतःच ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून हे वडेट्टीवारांनी सोडून द्यावं, अशी टीका देखील नितेश राणे यांनी केली आहे. राज्यात जुन ते ऑक्टोबर 2020 दरम्यान मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीची मदत केंद्राने आता जुलै अखेर घोषित केली. 3721 कोटी रुपयांच्या मदतीची राज्यातील शेतकऱ्यांना गरज असताना घोषित झालेली 700 कोटींची मदत ही तुटपुंजी आहे, असा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला होता.

दरम्यान, गुजरात आणि महाराष्ट्र एकाच देशातील दोन राज्य असताना महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना अतीवृष्टी नुकसानीची मदत एक वर्षानंतर का ? आणि ती सुद्धा तुटपुंजी ?, असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला होता. तर महाराष्ट्राचा मान ठेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नुकसानग्रस्त भागाचा दौरा करावा, अशी मागणी देखील त्यांनी केली होती.

थोडक्यात बातम्या-

“… तर त्यांचे हात-पाय तोडणार, हा महाराष्ट्र आहे…इथं राज ठाकरेंचं राज चालतं”

राज कुंद्राच्या अटकेनंतर शिल्पाच्या बहिणीची पोस्ट व्हायरल, म्हणाली…

…त्यासाठी युवकांना जगाच्या एक पाऊल पुढं रहावं लागेल- नरेंद्र मोदी

‘काम हवं असेल तर निर्मात्यांना खूश करावं लागेल’; शरीरसुखाची मागणी करणाऱ्यांना मनसेचा चोप

“सत्ताधारी असो वा विरोधक, संसदेत गोंधळ घालणाऱ्या खासदारांचं दोन वर्षांसाठी निलंबन करा”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More