चौकीदारानेच देश खाल्ला; शरद पवारांचा मोदींवर घणाघात

सातारा | देशाचे चौकीदार म्हणणारेच खरे चोर आहेत. त्यांनीच राफेल हा आतापर्यंतचा सर्वात मोठा घोटाळा केला. देशाच्या चौकीदारानेच देश खाल्ला. अशी घणाघाती टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. 

कराड येथील दत्त चौकात रविवारी सायंकाळी आयोजित काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससह अन्य पक्षांच्या महाआघाडीच्या पश्चिम महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा प्रारंभ सभेत पवार बोलत होते.

नोटाबंदी, जीएसटी, फसव्या कर्जमाफीच्या माध्यमातून सरकारने सर्वसामान्य जनता, शेतकरी व छोट्या व्यापाऱ्यांना निस्तनाबूत केले. त्यामुळे स्वतःला देशाचे चौकीदार म्हणणारेच खरे चोर आहेत, असं म्हणत शरद पवार यांनी मोदींवर हल्लाबोल केला.

दरम्यान, कराडच्या आघाडीच्या प्रचार सभेतही उदयनराजे भोसले यांनी आपल्या भाषणाचा समारोप करताना कॉलर उडविल्याने सभेत एकच जल्लोष झाला.

महत्वाच्या बातम्या-

-देवेंद्रजी मला तुमचा अभिमान वाटतो, तुम्ही दिलेला शब्द पार पाडला- उद्धव ठाकरे

-चेहऱ्यावर तलवारीने वार करुन राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकाची निर्घृण हत्या

-बीफ बिर्यानी खाऊन झोपला होतात का? पुलवामा हल्ल्यावरुन ओवेसींचा मोदींना सवाल

-मुंबई इंडियन्सची खराब सुरुवात, दिल्ली कॅपिटलकडून 37 धावांनी पराभव

-तुमची 56 इंचांची छाती आहे, मग ‘कुलभूषण’ला का सोडविले नाही?- शरद पवार