बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

हरियाणा आणि पंजाबमधील वातावरण तापलं, बॅरिकेड तोडत शेतकऱ्यांची राजभवनाकडे कूच

नवी दिल्ली | केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात गेल्या सात महिन्यांपासून शेतकऱ्यांचं आंदोलन चालू आहे. मात्र, तरीही केंद्र सरकारने यावर काही तोडगा काढलेला नाही. पंतप्रधान मोदींनी या कायद्यांनी शेतकऱ्याला फायदा होणार असल्याचं सांगितलं आहे. मात्र, शेतकरी आपलं आंदोलन मागे घेण्यास तयार नाहीत. अशातच शनिवारी 32 शेतकरी संघटनांनी चंदीगडमधील राजभवनाकडे कूच केली आहे. पंचकुला आणि मोहाली येथील हजारो शेतकरी बॅरिकेड्स तोडून चंदीगडमध्ये दाखल झाले आहेत.

चंदीगडमध्ये दाखल झालेल्या शेतकर्‍यांना प्रेस लाईट पॉईंटवर जबरदस्तीने रोखण्यात आले आहे. प्रशासनाकडून शेतकर्‍यांना येथेच थांबण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मात्र, शेतकरी पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहेत. सध्या या ठिकाणी अतिशय तणावपुर्ण वातावरण आहे. शेतकरी आपले ट्रॅक्टर्स इथून पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहेत.

शेतकऱ्यांनी आज दुपारी एकच्या सुमारास यादविंदर चौकात पोलिसांचे बॅरिकेड्स तोडले होते. शेतकरी आंदोलनाच्या आजच्या परिस्थितीविषयी बोलताना शेतकरी नेते रणजितसिंग म्हणाले की, आम्ही 5 हजारांपर्यंतच शेतकरी येतील, असा विचार केला होता. परंतु आज 30 हजाराहून अधिक शेतकरी आले आहेत.

दरम्यान, केंद्र सरकारने नव्यानं मंजूर केलेल्या कृषी विधेयकांमुळे देशभरातील शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संताप पहायला मिळत आहेत. जोपर्यंत केंद्र सरकार हे कायदे मागे घेत नाही. तोपर्यंत आपण मागे हटणार नसल्याचं आंदोलनातील शेतकऱ्यांचं म्हणनं आहे. नव्या कृषी विधेयकांमुळे देशातील वातावरण दिवसेंदिवस तापत चाललं आहे. यामुळे मोदी सरकार या कृषी कायद्यांबद्दल काय तोडगा काढणार? हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या – 

शेतकऱ्याच्या 14 वर्षीय लेकीची गगनभरारी, अमेरिकेत केलं यशस्वी विमानउड्डाण

पुढच्यावेळी पुणे- मुंबई महामार्ग उखडून टाकू- रविंद्र भेगडे

चिंता वाढली! देशातील नव्या कोरोनाबाधितांचा आकडा 50 हजारांच्या पुढेच

‘ये रिश्ता क्या कहलाता है’ फेम करण मेहराच्या अडचणीत वाढ!

…तर मी राजकीय संन्यास घेईल- देवेंद्र फडणवीस

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More