बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग! लग्नाआधी नवरदेव कोरोना पाॅझिटिव्ह; चक्क पीपीई घालून उरकलं लग्न

भोपाळ | कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशात अनेक नियम लागू करण्यात आले आहेत. यामध्ये लग्न समारंभासाठी देखील नियम लागू करण्यात आले. म्हणून अनेकांनी लग्न पुढं ढकलं आहे. अशातच एक विचित्र लग्न समारंभ समोर आला आहे. यामध्ये वर-वधुने लग्न पुढे न ढकलता अक्षरश: पीपीई घालून लग्न उरकलं.

संबंधित घटना ही मध्य प्रदेशमधील आहेे. तरुण-तरुणीचं लग्न ज्या मुहुर्तावर ठरलं होतं, त्याच्या एक दिवस आधी नवरदेवाचा कोरोना अहवाल पाॅझिटिव्ह आला. मात्र तरी देखील या दोघांनी लग्न पुढे न ढकलता ठरलेल्याच मुहूर्तावर लग्न करण्याचा अट्टाहास धरला. कोरोनाच्या वाढत्या प्रसाराच्या भितीमुळे या दोघा वर-वधूने लग्नात लग्नाच्या पोषाखाऐवजी पीपीई परिधान केलं होतं.

संबंधित घटनेची माहिती मिळताच रतलामच्या तहसिलदारांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र दोघांच्या विनंतीमुळे त्यांना देखील हे लग्न रोखता आलं नाही. त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली हा विवाह सोहळा पार पडला. या जोडप्याला पीपीई किट्स घालण्यास सांगण्यात आले जेणेकरून संक्रमण होणार नाही.

दरम्यान, या संकटाच्या काळात लग्न पुढे न ढकलता करण्यात आलेल्या या आगळ्या-वेगळ्या लग्नाचा एक व्हिडीओ देखील व्हायरल झाला आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी तहसिलदारांच्या उत्तरावर टिका केली आहे. तसेच या दोघांनी थोडा वेळ थांबून नंतर लग्न करायला हवं होतं, असं अनेकांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या-

व्हॅाट्सॲपच्या ॲडमीनसंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाचा सर्वात मोठा निर्णय

18 वर्षांवरील कोरोना लसीकरणावर विघ्न; मुंबई महापालिका आयुक्त म्हणतात…

रश्मी शुक्ला यांना सायबर सेलचं समन्स; फोन टॅपिंग प्रकरण अंगलट येण्याची शक्यता

खुशखबर! मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रातुन कोरोना हद्दपार, तज्ज्ञ म्हणतात…

“भारतीयांना कोरोना विरोधात लढण्यासाठी बळ मिळू दे”; पाकिस्तानी क्रिकेटपटूच्या भारताबद्दल संवेदना

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More