बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

फरार परमबीर सिंग यांचा ठावठिकाणा लागला, स्वत: दिली माहिती

मुंबई | राज्यासह देशात खळबळ माजवणारं प्रकरण काही महिन्यांपूर्वी मुंबई पोलीस दलात (Mumbai Police) घडल होतं. राज्याचे तत्कालिन गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर 100 कोटींच्या खंडणीच्या आरोपांनी राज्याच्या राजकारणाला हादरा दिला होता. या प्रकरणाचे प्रमुख मुंबईचे तत्कालिन पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Parambir singh) फरार घोषित झाले आहेत.

गेल्या काही दिवसांपासून परमबीर सिंग यांचा कुठंच ठावठिकाणा लागत नव्हता. पण आता परमबीर सिंग यांच्याबद्दल एक खात्रीलायक वृत्त आलं आहे. परमबीर सिंग हे सध्या पंजाबची राजधानी चंदीगड मध्ये आहेत. ही माहिती त्यांनीच जाहीर केली आहे. परिणामी अनिल देशमुख यांच्या प्रकरणाला आता एक नवीन वळण मिळणार आहे.

परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यविरोधात आरोप केले होते. पण त्यानंतर ते अचानक गायब झाल्यानं न्यायालय आणि पोलीस यांच्यासमोर त्यांना फरार घोषित करण्याशिवाय पर्याय उरला नव्हता. पण आता न्यायालयानं संरक्षण देणार म्हणल्यावर परमबीर सिंग यांनी त्यांची माहिती दिली आहे. आता राज्यातील पोलीस दलाला ते राज्यात आणण्यासाठी न्यायालयाची प्रक्रिया पुर्ण करावी लागणार आहे.

दरम्यान, परमबीर सिंग आणि अनिल देशमुख प्रकरणानं राज्याच्या पोलीस दलाची देशात बदनामी झाली आहे. जगातील उत्कृष्ट पोलीस यंत्रणेत गणल्या जाणाऱ्या मुंबई पोलीसांचा म्होरक्याच फरार झाल्यानं जोरदार चर्चा रंगल्या आहेत.

थोडक्यात बातम्या 

“राज्यातील रस्ते कतरिनाच्या गालासारखे गुळगुळीत असावेत”; राज्यमंत्र्यांचं वादग्रस्त वक्तव्य

“मी डंके की चोटपर सांगतोय, शरद पवारांनी विश्वासघात केला”

भारी काम झालं! रेशनधारक कुटुंबांसाठी मोदी सरकारची मोठी घोषणा

भर पत्रकार परिषदेत अनिल परब यांचा पडळकरांना टोला, म्हणाले…

एसटीचं विलीनीकरण नाहीच, कर्मचाऱ्यांचं निलंबन मात्र तातडीने रद्द होणार

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More