बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

WHO प्रमुखांच्या ‘या’ वक्तव्यानं जगाचं टेन्शन वाढलं, दिला हा गंभीर इशारा

नवी दिल्ली | गेल्या वर्षभरापासून कोरोना महामारीने जगभर हैदोस घातला आहे. कोरोनामुळे मोठी जीवितहानी झाली. यामध्ये व्यापार, उद्योगधंदे, रोजगार सर्व काही ठप्प राहिले त्यामुळे अनेक देशांच्या अर्थव्यवस्थाही ढासाळल्या. कोरोनाच्या पहिल्या लाटेत देशभरात लॉकडाऊनच्या सूचना देण्यात आल्या होत्या. पहिल्या लाटेला थोपवल्यावर दुसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी काही राज्य तयार नव्हती. याचाच फटका महाराष्ट्रालाही बसला आहे. मात्र या लाटेत आता आपल्याकडे लस उपलब्ध आहे. त्यामुळे आपण कोरोनाचा सामना करत आहोत. मात्र अशातच जागतिक आरोग्य संघटनेचे अध्यक्ष डॉ. टेड्रॉस यांनी गंभीर इशारा दिला आहे.

कोविड-19नं आत्तापर्यंत जगभरात 33 लाखांहून जास्त जीव घेतले आहेत. आपण आता करोनाच्या दुसऱ्या वर्षात आहोत. पण हे दुसरं वर्ष पहिल्या वर्षापेक्षा अधिक भयानक असेल. सार्वजनिक आरोग्य व्यवस्था आणि लसीकरण या दोन्हींच्या एकत्रित मदतीनेच आपण यातून बाहेर पडू शकू, असं डॉ. टेड्रॉस यांनी म्हटलं आहे.

या काळामध्ये लसीचा पुरवठा हे एक सर्वात महत्त्वाचं आव्हान आहे. मात्र जगातील काही प्रमुख लस उत्पादक देश यासंदर्भात इतर देशांना मदतीचं धोरण अंगीकारत असल्याचं पाहून मला आनंद होत असल्याचं डॉ. टेड्रॉस म्हणाले. जगभरातल्या करोनाच्या संकटाबाबत डॉ. टेड्रॉस यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी बोलताना त्यांनी हा गंभीर इशारा दिला आहे.

दरम्यान, दुसऱ्या लाटेत तातडीने मदतीची गरज असलेला भारत हा एकमेव देश नाही. नेपाळ, श्रीलंका, व्हिएतनाम, कंबोडिया, थायलंड आणि इजिप्तमध्ये देखील कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ झाल्याचं डॉ. टेड्रॉस यांनी सांगितलं.

 

थोडक्यात बातम्या- 

‘कुठून हे नग मिळतात?’; ‘या’ भाजप नेत्यावर जितेंद्र आव्हाडांची बोचरी टीका

आनंदाची बातमी! राज्यात आज नवीन रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त रूग्णांची संख्या जास्त, 53 हजारांपेक्षा रूग्ण परतले घरी

‘या’ राज्यात लॉकडाऊनच्या सकारात्मक प्रभावामुळे सरकारने आणखी लॉकडाऊन वाढवला

“खिजगणतीत नसलेल्या पृथ्वीराज चव्हाणांना मोदी नॉन परफॉर्मिंग असेट वाटणं स्वाभाविक”

खरं का काय! कोंबडा बोलू लागला अल्लाह ,अल्लाह; पाहा तुफान व्हायरल व्हिडीओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More