बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सगळं शहर पाण्यात, भूकेनं लेकरं व्याकूळ, दूध घेऊन ‘देवरुपी माणसं’ धावली

मुंबई | राज्यभरात पावसानं रौद्र रूप धारण केलं आहे. अनेकांच्या घरात पाणी शिरलं आहे. तर अतिवृष्टीमुळे अनेक गावांचा संपर्क तुटल्याच्या बातम्या समोर येत आहे. अशा संकट काळात माणुसकी जिवंत असल्याची जाणीव करुन देणारी बातमी समोर येत आहे.

मुसळधार पावसानं कल्याण डोंबिवली शहरात पाणी साचलं असल्यानं अनेकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. या संकट काळात खरे कुटुंबाच्या दोन चिमुकल्यांना दूध न मिळाल्यानं ते मोठमोठ्यानं रडत होते. जोरदार पावसानं बाहेर सगळीकडे पाणी आणि दुकानंही बंद असल्यानं चिमुकल्यांची भूक भागवण्यासाठी दूध मिळत नव्हतं. यातच दोन तरूणांनी चिमुकल्यांची आर्त हाक ऐकत क्षणाचाही विलंब न लावता दूध पोहोचवलं.

सगळीकडे पाणी साचल्यानं आणि चिमुकल्यांसाठी कुठेही दूधाची व्यवस्था होत नसल्यानं बाळाची आत्या संगीता खरेनं कल्याणातील युवक महेश बनकर या तरुणाला मदतीसाठी फोन केला. महेशनं क्षणाचाही विलंब न करता त्याच्या मित्रासोबत गाडी उपलब्ध होत नसताना, कमेरएवढ्या साचलेल्या पाण्यातून पायी रस्ता काढत त्या चिमुकल्यांसाठी आपल्या जीवाची पर्वा न करता दूधाची व्यवस्था करून दिली.

दरम्यान, देवांश आणि सारांश हे दोघेही जुळे भाऊ आता एक वर्षाचे असून त्यांच्या आईला कोरोना झाला आहे. त्यामुळे डाॅक्टरनं लगेच आईचं दूध बाळांना पाजू नका असा सल्ला दिला होता. बाळाचे वडिलही जोरदार पावसानं बाहेरचं अडकले होते. घरात फक्त आजी आजोबा असल्यानं त्यांनाही भीती वाटू लागली होती. मात्र या तरूणांनी केलेल्या मदतीनं आजोबांच्याही चेहऱ्यावर हसू येऊन गेलं. तरूणांनी कठिण परिस्थितही केलेल्या मदतीमुळे त्याचं कौतुक होत आहे.

थोडक्यात बातम्या – 

पती राज कुंद्राच्या अटकेनंतर शिल्पा शेट्टीने घेतला मोठा निर्णय!

कोल्हापूर जिल्ह्याला महापूराचा धोका?; पंचगंगा नदीने ओलांडली धोक्याची पातळी

“केंद्राच्या तिजोरीत सर्वाधिक पैसा टाकणाऱ्या महाराष्ट्रावर संकट, मोदींनी सढळ हाताने मदत करावी”

चिपळूण आणि खेड भागात भीषण परिस्थिती; NDRF च्या तुकड्या तैनात

महाड शहराला पुराच्या पाण्याचा वेढा; बचावकार्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून हेलिकॉप्टरची मागणी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More