बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

विधवेवर पोलिसाकडूनच बलात्कार, गावकऱ्यांनी असा शिकवला धडा

चंदिगड | कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याची जबाबदारी असलेल्या पोलिस विभागाकडूनच जेव्हा कायद्याची पायमल्ली होते तेव्हा सामान्य नागरिकांनी नेमकं कोणाकडे जावं हा प्रश्न आ वासून उभा राहतो. पंजाबमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये कायद्याचे रक्षकच भक्षक बनल्याचं धक्कादायक चित्र समोर आलं आहे.

सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक असलेल्या गुरविंदर सिंह याने एका विधवा महिलेवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला आहे. या महिलेवर अत्याचार करण्याच्या तयारीत असतानाच या पोलिस अधिकाऱ्याला संबंधित गावकऱ्यांनी रंगेहाथ पकडलं आणि पोलिसांच्या ताब्यात दिलं. पंजाबच्या विझ भटिंडाच्या सीआयए स्टाफमध्ये तैनात असलेल्या पोलिस अधिकाऱ्याचे अत्याचार वाढत असल्याने गावकऱ्यांनी त्याला चांगलाच धडा शिकून पोलिसांच्या हवाली केलं.

अफू तस्करीचा खोटा गुन्हा दाखल करून एका विधवा महिलेच्या 20 वर्षाच्या मुलाला अटक करून त्याला कोरोनाचे लक्षण असताना देखील पोलिसांनी घेऊन गेले. या मुलाला गुन्ह्यातून मुक्त करण्यासाठी गुरविंदर सिंहने या महिलेकडे दोन लाख रुपयांची मागणी केली होती. तर एकदा घरात घुसून उपचारासाठी जमा केलेले 60 हजार रुपये त्याने चोरून नेले.

पीडित महिलेने नातेवाईकांकडून विनवणी करून एक लाख रुपयांची व्यवस्था करून ते पैसे गुरविंदर सिंह याला दिले. पण त्याने मुलाला सोडलंच नाही तर या विधवा महिलेकडे शारीरिक संबंधाची मागणी केली. या प्रकरणात या महिलेने गावातील लोकांची मदत घेतली आणि या नराधमाला चांगलीच अद्दल घडवली. रात्री आठ वाजता आरोपीला घरी बोलवूून घरात छुपा कॅमेरा बसवला आणि तो महिलेवर बलात्कार करणारच तेवढ्यात गावकऱ्यांनी त्याला रंगेहाथ पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं. यासंबंधी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत गुरविंदर सिंह याला नोकरीवरुन काढून टाकलं आहे. तसेच त्याने पोलीस कोठडीमध्ये आत्महत्या करण्याचाही प्रयत्न केल्याचं बोललं जात आहे.

थोडक्यात बातम्या –

राज्यात 4 दिवस पावसाचा इशारा; अरबी समुुद्रातलं ‘तोक्ते’ चक्रीवादळ ‘या’ किनारपट्टीवर धडकणार

परमबीर सिंह यांना अटक करणार?; राज्य सरकारची न्यायालयात मोठी माहिती

6 मॅाडेल्सनी बोटीवर केलं असं कृत्य, संपूर्ण तुर्कस्तानमध्ये वातावरण तापलं

आज अक्षय्य तृतीया! या दिवसाचं महत्त्व तुम्हाला माहिती आहे का?; जाणून घ्या एका क्लिकवर

अकोल्यात जात पंचायतीनं करायला लावलं धक्कादायक कृत्य, 10 जणांविरोधात गुन्हा दाखल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More