बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कुठं बेड मिळेना, दुर्दैवी पत्नी पतीला तोंडाने श्वास देत राहिली मात्र…

नवी दिल्ली | कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेने मोठी हानी होत आहे. या लाटेत अनेकांनी आपल्या जवळच्या लोकांना गमावलं आहे. त्यासोबतच काही कुटुंबच्या कुंटुंब कोरोनाने खाल्ली आहेत. कोरोना वाढत आहे तर दुसरीकडे ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत. अशाचप्रकारे एक महिला आपल्या पतील दवाखान्यात घेऊन जाताना ती आपल्या तोंडाने श्वास देत होती.

आपल्या पतीला वाचवण्यासाठीचा या महिलेने केविलवाणा प्रयत्न केला. ती आपल्या पतीला रिक्षातून श्रीराम हॉस्पिटल, साकेत हॉस्पिटल आणि केजी नर्सिंग होममध्ये गेली होती. मात्र तिथे तिला बेड उपलब्ध नव्हता त्यामुळे त्यांना तिथे दाखल करून घेतलं नाही. त्यानंतर तिने आपल्या पतीला एसएस मेडिकल कॉलेजमध्ये आणलं. रस्त्यामध्ये येताना पतीला श्वास घ्यायला त्रास होत होता म्हणून ती आपल्या तोंडाने श्वास देत होती. रेणू सिंघल असं संबंधित महिलेचं नाव असून तिच्या पतीचं नाव रवि सिंघल असं आहे.

एसएन मेडिकल कॉलेजमध्ये पोहोचल्यालर रवि सिंघल यांना डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केलं. रेणू यांना यावर आधी विश्वास बसला नाही. पण त्यानंतर त्यांना अश्रू अनावर झाले. विकास सेक्टर सातमध्ये सिंघल वास्तव्यास होते. आग्र्यामधील ही हृदयद्रावक घटना समोर आली.

दरम्यान, इतका जीवाचा आटापिटा करूनही रवि सिंघल यांना ती वाचवू शकली. इतकी भयावक परिस्थिती बाहेर आहे. ऑक्सिजन अभावी अनेकजणांना आपला जीव गमवावा लागत आहे. त्यामुळे इतर नागरिकांनी घरात राहून योग्य तूी काळजी घेतली पाहिजे.

थोडक्यात बातम्या- 

कोरोनाग्रस्तांना बेडसाठी भरत जाधवची आयडियाची कल्पना, “हीच ती वेळ आपले कर्तव्य बजावण्याची”

संजय राऊत यांना ‘मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार’ जाहीर

‘आमचं प्राधान्य अमेरिकन नागरिकांना’; लसीसाठी लागणारा कच्चा माल न देण्यावर अमेरिका ठाम

मोदी आणि शहा दोघेही विनामास्क फिरतात, त्यांनी कोणते इंजेक्शन घेतलं?- नाना पटोले

सुजय विखेंचा गनिमी कावा, स्पेशल विमानानं दिल्लीहून 10 हजार रेमडेसिवीर आणली!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More