बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

दगा देणाऱ्या पतीला खासगी गुप्तहेराद्वारे तिनं रंगेहाथ पकडलं

नवी दिल्ली | 33 वर्षाच्या महिलेने आपल्या पतीवर असलेला संशय खरा आहे की खोटा हे तपासण्यासाठी चक्क गुप्तहेराची मदत घेतली. त्यानंतर महिलेचा संशय खरा ठरला आणि तिने पतिला रंगेहाथ पकडलं. या संपुर्ण प्रकरणाचा खुलासा स्वतः महिलेने केला असून या बाबतची सविस्तर माहिती तिने दिली आहे.

महिलेने सांगितल्यानुसार, तिने आपल्या पतीला सेक्सवर्करबाबत मोबाइलवर सर्च करताना पाहिलं होतं. मात्र तेव्हा त्याने काहीतरी सांगून तिला विश्वासात घेतलं, असं महिलेनं म्हटलं आहे. तरीसुद्धा महिलेने यावर शोध सुरू ठेवला. अखेर महिलेनं एका खासगी गुप्तहेराची मदत घेतली. गुप्तहेराला आपल्या ऑफिसचा टाइम आणि पतीच्या ऑफिसचा टाइम महिलेने सांगितला होता.

गुप्तहेराने अतिशय प्रोफेशनल पद्धतीने काही दिवस त्याचा पाठलाग केला. एक महिन्यात त्याच्या कारनाम्यांचा खुलासा झाला. महिला ऑफिसमध्ये गेल्यावर किती तरूणी घरी येतात याबाबतची सर्व माहिती गुप्तहेराने महिलेला दिली. मात्र महिलेला धक्का तर तेव्हा बसला जेव्हा त्याने सेक्स वर्करबाबत सांगितलं.

दरम्यान, गुप्तहेराने महिलेला पुरावे म्हणून काही फोटो दिले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी ऑफिसला जाताना महिलेनं ते फोटो घरात लावले आणि ऑफिसला रवाना झाली. जेव्हा महिला ऑफिसमधून घरी परतली तेव्हा तिचा पती एकदम शांत होऊन बसला होता. त्यानंतर महिलेने त्याच्यासोबत बोलणंच बंद केलं. तसेच आपल्या पतीबाबत आता पाठलाग करण्याची आणि त्याच्याबाबत काही वाटण्याची भावना राहिली नसल्याचं देखील महिलेने सांगितलं आहे. आपल्याला केवळ एकटेपणा आणि विश्वासघात जाणवत असून मी त्याच्यावर पुन्हा विश्वास ठेवू शकत नाही, अशा शब्दात महिलेने आपलं दु:ख व्यक्त केलं.

थोडक्यात बातम्या-

“विद्यार्थ्यांच्या आरोग्याला प्राधान्य देत दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात”

रियाबद्दल धक्कादायक खुलासा, सुशांतआधी ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्यासोबत होतं अफेअर!

पुण्यात आरोग्य आणीबाणी, काय करत आहेत पुण्याचे कारभारी?, पुणेकरांचा सवाल

शरद पवार यांच्यावरची दुसरी शस्त्रक्रिया यशस्वी; नवाब मलिक यांनी दिली माहिती

‘2 दिवसांनी लाॅकडाऊन लागणार आहे’; ठाकरे सरकारमधील मंत्र्याचं व्यापाऱ्यांना महत्वाचं आवाहन

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More