बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘मला रोहित शर्मासारखं…’; ऑस्ट्रेलियाच्या ‘या’ धडाकेबाज क्रिकेटपटूची बायको रोहितवर फिदा!

मुंबई | ओव्हल टेस्टमध्ये रोहितने शतक झळकवत भारतीय संघाला विजय मिळवून दिला होता. भारत विरुद्ध इंग्लंड झालेल्या सीरिजमध्ये रोहित शर्माने टीम इंडियाकडून सर्वात जास्त रन काढले होते. कसोटी असो की टी-20 सामना रोहित शर्मा आपल्याच शैलीत खेळतो, त्याच्या फलंदाजीमुळे अनेक खेळाडू त्याच्यावर फिदा आहेत. अशाच प्रकारे ऑस्ट्रेलियन खेळाडू मिचेल स्टार्कची पत्नी एलिसासुद्धा रोहितची फॅन झाली आहे.

मला रोहितसारखं खेळण्याची इच्छा आहे. रोहित ज्या पद्धतीनं सर्व प्रकारच्या फाॅरमॅटमध्ये फलंदाजी करतो तसं मला जमेल का?, असा विचार देखील आपण करत असल्याचं एलिसाने यावेळी स्पष्ट केलं. तसेच भारताविरुद्धच्या सीरिजबाबत बोलताना भारतीय टीम खूप धोकादायक असल्याचं देखील हिलीने म्हटलं आहे.

भारतीय महिला टीम सध्या ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आहे. रोहितबाबत बोलताना एलिसाने भारतीय महिला टीमला इशारा दिला आहे. एलिसा ही ऑस्ट्रेलिया संघाची फलंदाज आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये 30 सप्टेंबर पासून डे-नाईट- टेस्ट मॅच होणार आहे. या टेस्टमध्ये वन डे सारखं खेळणार असल्याचं हिलीने सांगितलं आहे.

दरम्यान, रोहितपासून आपल्याला प्रेरणा मिळाली असल्याचं हिलीने जाहीर केलं आहे. तसेच महिला टीम मधील आमच्या विरुद्ध खेळणारी पूनम यादवनेहमी वेगळ्या पद्धतीनं बाॅलिंग करत असल्याचं एलिसा म्हणाली.

थोडक्यात बातम्या-

भारताचा कधीही अफगाणिस्तान होणार नाही, हिंदू जगातील सर्वात…’; जावेद अख्तर यांचं मोठं वक्तव्य!

राज ठाकरे भाजपच्या विरोधात बोलले होते की राष्ट्रवादीच्या हे…- रोहित पवार

उद्धव ठाकरेंची लोकप्रियता ही ममता बॅनर्जी आणि स्टॅलिन यांच्या तोडीची- जावेद अख्तर

पिल्लाचा मृतदेह सोंडेत घेऊन फिरताना दिसली हत्तीण, डोळ्यात पाणी आणणारा व्हिडीओ व्हायरल

“तुम्ही गाणं म्हटलं की कलाकार आणि लोककलावंतानी म्हटलं की नाचे”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More