बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

दिग्गज धावपटू मिल्खा सिंह यांच्या पत्नीचं कोरोनामुळे निधन

चंदीगड | कोरोनाने देशभरात थैमान घातलेलं पाहायला मिळत आहे. महमारीच्या दुसऱ्या लाटेत अनेकांना कोरोनाचा संसर्ग झाला. अशातच भारताचे महान धावपटू मिल्खा सिंह आणि त्यांच्या पत्नी निर्मल मिल्खा सिंग यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. परंतू मिल्खा सिंह यांची प्रकृती ठिक झाल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता. मात्र, त्यांच्या पत्नी निर्मल यांचा कोरोनाने मृत्यु झाला आहे.

मिल्खा सिंग यांना मागील आठवड्यात मोहालीच्या फोर्टीज हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर दोन दिवसांनी त्यांच्या पत्नी निर्मल कौर यांनाही कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांनाही हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. हॉस्पिटलमधील उपचारानंतर मिल्खा यांची तब्येत सुधारली आहे. मात्र निर्मल कौर यांना आवश्यक असलेल्या ऑक्सिजनमध्ये वाढ झाली होती. त्यानंतर कुटुंबीयांच्या विनंतीवरुन त्यांना आयसीयूमध्ये शिफ्ट करण्यात आलं होतं.

डॉक्टरांनी पुर्ण प्रयत्न केल्यानंतरही त्यांचे प्राण वाचवण्यात अपयश आलं. ऑक्सिजनमध्ये वाढ झाल्यानंतर त्यांना आयसीयुमध्ये हलवण्यात आलं होतं. त्यांची प्रकृती काही प्रमाणात सुधारत असल्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र, त्यानंतर त्यांची प्रकृती खालावली. निर्मल सिंह या पंजाब सरकारमध्ये खेल मार्गदर्शक आणि भारतीय महिला राष्ट्रीय वॉलीबॉल संघाच्या माजी कर्णधार होत्या.

दरम्यान, मिल्खा सिंह यांचे वय जास्त असल्यानं ते अंत्यसंस्काराला उपस्थित राहु शकले नाही, असं सांगण्यात येत आहे. कोरोना प्रोटोकॉल अंतर्गत निर्मल सिंह यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

थोडक्यात बातम्या-

पुणेकरांना दिलासा; आजपासून आणखी नियम शिथिल होणार, वाचा नव्या गाईडलाईन्स

जगभर थैमान घातलेल्या कोरोना मातेचं मंदीर जमीनदोस्त

दिलासादायक! महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात आज एकाही कोरोना रूग्णाचा मृत्यु नाही

महाराष्ट्रात नव्या कोरोनाबाधितांची संख्या 10 हजारांच्या घरात; पाहा दिलासादायक आकडेवारी

जबरदस्त! अखेर सांगलीच्या ‘या’ कंपनीला मिळाली कोरोना इंजेक्शनच्या मानवी चाचणीची परवानगी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More