बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कडक सॅल्यूट! पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानाची पत्नी झाली लेफ्टनंट

नवी दिल्ली | पुलवामा येथे दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत मेजर विभूती शंकर धौंडीयाल हे शहीद झाले होते. त्यांचं 9 महिन्यांपूर्वी लग्न झालं होतं. त्यांच्या 9 महिन्यांच्या संसारात त्यांची साथ देणाऱ्या नितिका कौल धौंडीयाल यांनी पतीच्या जाण्याचं दुःख विसरून सैन्यात दाखल होण्याचा निर्णय घेतला.

धौंडीयाल यांचं बलिदान निकिता यांनी व्यर्थ जाऊ दिलं नाही. सहा महिन्यानंतर निकिता यांनी Short Service Commission चा फॉर्म भरला आणि नितिका कौल धौंडीयाल परिक्षेत उत्तीर्णही झाल्या.

चेन्नईत त्यांनी Officers Training Academy प्रशिक्षण घेतलं आणि आता 29 मे 2021 ला त्या भारतीय सैन्यात लेफ्टनंट निकिता कौल धौंडीयाल म्हणून रुजू होणार आहेत. पतीच्या जाण्याचं दु:ख कुरवाळत न बसता सैन्यात दाखल होण्याचा निर्णय घेणाऱ्या नितिका धौंडीयाल यांचं सर्व स्तरातून कौतुक केलं जात आहे.

2019 साली दहशदवाद्यांनी पुलवामा येथे केलेल्या भ्याड हल्ल्याच्या जखमा आजही ताज्या आहेत. केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी कार बॉम्बच्या मार्फत केलेल्या हल्ल्यात भारताचे 40 जवानांना वीरमरण प्राप्त झालं.

थोडक्यात बातम्या- 

‘यास’ चक्रिवादळाचा ट्रेलर, ताशी 150 कि.मी वेगानं धडकण्याची शक्यता ; पाहा व्हिडीओ

कोरोनाची लस जगात सर्वात आधी घेणाऱ्या ‘विल्यम शेक्सपिअर’चा मृत्यू

माहेरी जाताना नवऱ्याला बाईक थांबवायला सांगितली, त्यानंतर तिने जे केलं त्याने सर्वच हादरले

खळबळजनक! शौचालयासाठी घराबाहेर पडलेल्या महिलेवर गँगरेप, खांबाला लटकवलं अन्…

रत्नागिरीत आढळला पांढरा कावळा, पाहा व्हिडीओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More