बायको मागत होती मिठाई, नवऱ्यानं केलेली गोष्ट पाहून मुंबई हादरली!

मुंबई | मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. पत्नीच्या आजारपणाला कंटाळलेल्या एका वृद्धाने तिची निर्घृण हत्या केली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. डायबिटिज असताना पत्नी वारंवार मिठाई खायला मागत होती. यामुळे संतापलेल्या वृद्ध पतीने पत्नीची हत्या केल्याची घटना मुंबईत घडली आहे.

शकुंतला यांना मधुमेह होत्या तर विष्णुकांत हे देखील गेल्या चाळीस वर्षांपासून मधुमेहाने त्रस्त होते. पत्नीला मधुमेह असतानाही ती सतत मिठाई खायची.

डॉक्टरांनी कित्येकदा इशारा दिल्यानंतरही तिने मिठाई खाणं सोडलं नाही. शकुंतला यांच्या पतीनेही त्यांना मिठाई खाण्यापासून रोखलं होतं. मात्र त्या कोणाचेच ऐकत नव्हत्या. पतीने मिठाई दिली नाही की त्या त्यांच्यासोबतही वाद घालत होत्या.

आरोपीने पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार, दुपारी शकुंतलाने मिठाई मागितली होती. एकदा मिठाई आणून दिल्यानंतरही तिने आणखी गोड हवं असल्याचा हट्ट धरला. त्यामुळं आरोपीला राग आला. याच रागाच्या भरात त्याने पत्नीवर चाकुने हल्ला केला. इतकंच नव्हे तर, आरोपीने चाकुने स्वतःवरही हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यो जोडप्याचा मुलगा अमेरिकेत राहत असून पोलिसांनी त्याला या घटनेबाबत सूचना दिली आहे.

घरात काम करणारी मोलकरीण जेव्हा बालुर यांच्या घरी पोहोचली तेव्हा त्यांनी पाहिलं की शकुंतला या बेडवर गंभीर जखमी होऊन पडल्या होत्या. तर, विष्णुकांत त्याच बाजूला एका खुर्चीवर बसले होते. यानंतर त्यांनी पोलिसांना कळवलं. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More