बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

हॅाटेलच्या रुममधून येत होता पत्नीचा आवाज, मात्र पतीनं पकडताच केला धक्कादायक खुलासा

नवी दिल्ली | पश्चिम बंगाल येथील अलीपुरद्वार शहरात विचित्र घटना घडली आहे. पतीने हाॅटेल रुममधून आपल्या पत्नीचा आवाज येताना ऐकला. यानंतर पतीने याबाबतचा खुलासा करण्यासाठी पत्नीला हाॅटेल रुममध्येच पकडलं. मात्र आपली बाजू सांगताना पत्नीने जो खुलासा केला तो अत्यंत धक्कादायक आहे.

अलीपुरद्वार शहरातील चौपाटी येथील एलीट हाॅटेलमध्ये दुपारी सुमारे 1 वाजता ही घटना घडली आहे. संबंधित पतीने आपल्या पत्नीचा पाठलाग करुन तिला तिथं जाताना पाहिलं. संबंधित पतीचं नाव समीर दास असं आहे. समीरने आपल्या पत्नीला एका अज्ञात व्यक्तीसोबत अश्लील अवस्थेत पकडलं. यानंतर संपुर्ण परिसरात खळबळ उडाली आणि बरेच लोक तिथं जमा झाले. यावेळी अज्ञात व्यक्ती हाॅटेल मॅनेजरच्या मदतीने फरार झाला.

समीरने पोलिसांना याबाबतची माहिती दिली. तसेच पोलिसांनी समीर यांच्या पत्नीला आणि हाॅटेल मालकाला अटक केली असून संबंधित हाॅटेलवर अनेकवेळा आरोप करण्यात आले आहेत. यानंतर पत्नीने सांगितलं त्यानं पोलीस देखील हैराण झाले आहेत. आपल्या पतीनेच आपल्याला तिथं पाठवलं असून संबंधित अज्ञात व्यक्तीसोबत अश्लील फोटो तसेच व्हिडीओ काढून त्याला धमकवण्यास सांगितलं असल्याचं समीर यांच्या पत्नीने पोलिसांना सांगितलं.

दरम्यान, समीर यांनी याबाबत सांगताना आपल्या पत्नीचं असं वागणं अनेक दिवसांपासूनचं असल्यामुळे त्यादिवशी त्यानं आपल्या पत्नीचा पाठलाग केला. यावेळी तिनं त्या व्यक्तीला फोन करुन बोलावून घेतलं. तसेच काही वेळाने हाॅटेलच्या रुममधून पत्नीचा आवाज येऊ लागल्याने त्यानं दोघांना तिथंच पकलं. यातील काय खरं आणि काय खोटं याचा आता पोलीस तपास करत आहेत.

थोडक्यात बातम्या-

आता कोरोनाचा पूर्ण नायनाट होणार?; शास्त्रज्ञांनी विकसित केली अँटी व्हायरल थेरपी

जागतिक बँकेचे शिक्षण विषयक सल्लागार म्हणून रणजितसिंह डिसले यांची नियुक्ती

हर्षवर्धन पाटील यांनी घेतली पृथ्वीराज चव्हाणांची भेट; सरकारकडे केली ही महत्वाची मागणी

‘छगन भुजबळ आणि विजय वडेट्टीवार यांनी राजीनामा द्यावा’; ओबीसी आरक्षणावरून भाजप आक्रमक

मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठाकरे सरकारने घेतले हे 3 महत्वाचे निर्णय; पाहा एका क्लिकवर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More