मुंबई | कोरोना संसर्ग रोगाची मंदावलेली गती लक्षात घेता, उद्यापासून विधीमंडळाचे मुंबईत हिवाळी अधिवेश सुरु होणार आहे. हे अधिवेशन 14-15 डिसेंबर या कालावधीत घेतले जाणार आहे. त्यामुळे अधिवेशनाला दोनच दिवसांचा कालावधी मिळणार आहे.
अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच सोमवारी पुरवणी मागण्या मांडल्या जाणार असून, त्याचबरोबर दिवंगत आजी-माजी सदस्यांना श्रद्धांजली वाहून पहिल्या दिवसाचे कामकाज संपवले जाणार आहे.
हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये घेण्याची प्रथा आहे. मात्र, कोरोनाचे सावट लक्षात घेता, मुंबईतच हिवाळी अधिवेशन घेण्याचा निर्णय कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला. हे अधिवेशन 7 डिसेंबरला घेण्यात येणार होते.परंतु 14 आणि 15 डिसेंबर या दोन दिवसांत अधिवेशन होणार आहे.
दरम्यान, या अधिवेशनात महिला, बालकांवरील अत्याचाराच्या संदर्भात शक्ती कायद्याचे विधेयक मांडण्यात येणार आहे.
थोडक्यात बातम्या-
मुंबई ढगाळ वातावरणासह पावसाची रिमझिम; विदर्भ, कोकणाला पावसाचा इशारा
राजनाथ सिंह यांच्या भेटीनंतर हरियाणाच्या उपमुख्यमंत्र्यांचा आश्चर्यजनक दावा, म्हणाले…
‘लोकहो, शेतकरी मरत आहे!’,म्हणत संजय राऊतांनी केलं आवाहन
शुद्राला शुद्र म्हटलं, तर वाईट वाटतं; प्रज्ञा ठाकूर यांचं वादग्रस्त विधान
फेक टीआरपीप्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; रिपब्लिक चॅनेलच्या ‘या’ व्यक्तीला अटक