बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

हिवाळी अधिवेशन: …म्हणून पहिल्याच दिवशी हिवाळी अधिवेशन स्थगित

मुंबई | विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला (Winter session) आजपासून सुरुवात झाली आहे. अनेक दिवसांपासून अधिवेशनावरून राजकारण तापल्याच पाहायला मिळतं होतं. मात्र आज अखेर विरोधक आणि सत्ताधारी आमनेसामने आले आहेत. पहिल्याच दिवशी विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये खडाजंगी रंगल्याने अधिवेशन स्थगित करावं लागलं आहे.

“पंतप्रधान यांनी प्रत्येकाच्या खात्यावर 15 लाख रुपये देणार असं आश्वासन दिलं होत, असं उर्जामंत्री नितीन राऊत यांनी अधिवेशनात बोलताना म्हटलं. त्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी पंतप्रधानांनी असं वक्तव्य केलचं नव्हत, त्यामुळे राऊत यांनी अधिवेशनात माफी मागवी, अशी मागणी फडणवीसांनी लावून धरली. तर राऊतांनी त्याला नकार दिला.

फडणवीस आणि राऊत यांच्यात अधिवेशनात चांगलाच वाद पेटला. यानंतर या वादात शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनीही उडी घेतली. भास्कर जाधव यांनी नरेंद्र मोदींची नक्कल करत राऊतांचे समर्थन केले. त्यानंतर फडणवीस चांगलेच आक्रमक झाल्याने वाद वाढतच गेला. अखेर हा वाद इतका वाढला की विधानसभा अध्यक्षांना कामकाज 2 वाजेपर्यंत स्थगित कराव लागलं

दरम्यान, फडणवीसांनी यावेळी पेपरफुटी प्रकरणावरून राज्य सरकारला धारेवर धरलं आहे. “माजी आमदारकडे ध्वनीफित आहे. एका एका पदासाठी किती बोली लागली याची माहिती आहे. 4 लाख 61 हजार अर्ज प्राप्त झाले होते. क गटाच्या पदासाठी 15 लाख तर ड गटाच्या पदासाठी 8 लाखांची बोली लागली होती. अमरावतीत 200 जणांची बोगस नियुक्ती करण्यात आली होती,” असे गंभीर आरोप यावेळी  फडणवीसांनी केले .

थोडक्यात बातम्या-

हिवाळी अधिवेशन: देवेंद्र फडणवीसांची ‘ही’ मागणी अजित पवारांनी केली मान्य

हिवाळी अधिवेशन: “लोकशाही विदाऊट मुख्यमंत्री असा प्रकार आज पहिल्यांदाच पाहिला”

Omicron: ‘..तर शाळा पुन्हा बंद होऊ शकतात’; वर्षा गायकवाड यांचं सूचक वक्तव्य

हिवाळी अधिवेशन: पहिल्याच दिवशी विधानसभेत ‘इतके’ जण कोरोना पॉझिटीव्ह

हिवाळी अधिवेशन: पहिल्याच दिवशी विरोधक आक्रमक, विधान भवनाच्या बाहेर घोषणाबाजी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More