मोठी बातमी! संजय राठोडांनी शरीरसुखाची मागणी केल्याप्रकरणी महिलेची पोस्टाने पोलिसात तक्रार
यवतमाळ | शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री संजय राठोड यांच्या अडचणीत पुन्हा वाढ झाली आहे. संजय राठोड यांच्या विरोधात एका माहिलेने तक्रार केली आहे. यवतमाळच्या पोलिसांकडे पोस्टाने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. याबाबत भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी माहिती दिली आहे.
संजय राठोड यांनी माझ्याकडे शरीरसुखाची मागणी केली आहे, अशी लिखित तक्रार संबंधित महिलेने केली आहे. शिवसेना आमदार आणि माजी मंत्री संजय राठोड यांच्यावर शरीरसुखाची मागणी केल्याची लिखित सविस्तर तक्रार एका भगिनीने यवतमाळ पोलिसांना पोस्टाने पाठवली आहे, असं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे.
संजय राठोड मंत्री असल्यामुळे तक्रारीची दखल घेतली गेली नाही. तसेच आजही संजय राठोड माझ्याकडे शरीरसुखाची मागणी करत लैंगिक छळ करतो, असं त्यात म्हटलं असल्याचं चित्रा वाघ यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. यासोबत चित्रा वाघ यांनी या तक्रारीच्या पत्राचे दोन फोटोही पोस्ट केले आहेत.
दरम्यान, याधीही एका तरूणीच्या आत्महत्या प्रकरणामुळे गोत्यात आले होते. त्यावेळी त्यांना आपल्या मंत्रिपदावरून पायउतार व्हावं लागलं होतं. आता महिलेच्या तक्रारीमुळे त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
थोडक्यात बातम्या-
मोठी बातमी! संजय राठोडांनी शरीरसुखाची मागणी केल्याप्रकरणी महिलेची पोस्टाने पोलिसात तक्रार
शाब्बास पुणेकरांनो! पुण्यातील नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय घट, वाचा दिलासादायक आकडेवारी
हॅलो, मी शरद पवार बोलतोय! ‘त्या’ नकली फोन कॉलमुळे मंत्रालयात खळबळ
देशात आणीबाणीसारखी परिस्थिती- खासदार सुप्रिया सुळे
राष्ट्रवादीच्या जन्मानंतर महाराष्ट्रात जातीपातीचा मुद्दा मोठा झाला- राज ठाकरे
Comments are closed.