बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भररस्त्यात महिलेने कारचालकाला केली बॅटने मारहाण, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

नवी दिल्ली | सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. एका महिलेने कारचालकाच्या कानशिलात लगावल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यावरच ती महिला थांबली नाही तर तिने बॅटने देखील कारचालकाला मारहाण केली आहे. लखनऊसारखीच ही घटना असल्याने अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.

हा व्हिडीओ पानिपतच्या शेरा गावातील आहे. एका महिलेने कारचालकांशी आधी वाद घातला. त्यानंतर त्याच्या कानशिलात लगावली. तिने बॅटने देखील त्याला मारहाण केली. तसेच आपल्या नातेवाईकांना बोलावून घेतलं आणि कारचालकाची धुलाई केली.

घडलेल्या या प्रकारामुळे रस्त्यावर वाहतुकीचा देखील खोळंबा झाला. कारचालकाने 112 नंबरवर फोन करून आपला जीव वाचवला. तसेच याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करून महिलेविरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे.

या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असं देखील म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या-

पीएफ खातेदारांनो तात्काळ ‘हे’ काम करा, अन्यथा होईल मोठं नुकसान

‘पुढील दोन महिने धोक्याचे’; कोवीड टास्क फोर्सनं राज्याला दिला गंभीर इशारा

पुण्यातील गॅरेजला भीषण आग; 14 बसेस जळून खाक, दोनजण गंभीर जखमी

‘मीडियावाले उगीच कंड्या पिकवू नका’; फडणवीसांनी माध्यमांना फटकारलं!

मोठी बातमी! एकनाथ खडसे बॉम्बे रूग्णालयात दाखल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More