पेरु | कोरोनाने पुन्हा डोकं वर काढायला सुरुवात केली आहे. त्यामुळे सर्वांनी काळजी घेतली पाहिजे. सर्वांनी मास्क वापरलं पाहिजे. मात्र अनेक जण या नियमांचं पालन करताना दिसत नाहीत. अशातच मास्क न घातलेल्या तरुणीला पोलीसांनी पडकल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
मास्क न घातलेल्या एका तरुणीला पोलिसांनी पकडलं. त्यानंतर त्या पोलिसांनी त्या तरुणीची माहिती आपल्या वहित लिहायला सुरुवात केली. तेवढ्यात तरुणी पोलिसांच्या जवळ येण्याचा प्रयत्न करत असल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे.
काही वेळानंतर पोलीस आणि तरुणी एकमेकांना किस करताना दिसत आहेत. हा सगळा प्रकार रस्त्यावरील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. हा व्हिडीओ एका न्यूज चॅनलने सोशल मिडीयावर शेअर केला आहे.
हा प्रकार उघड झाल्यानंतर त्या पोलीस कर्मचाऱ्याला नोकरीवरुन काढून टाकलं आहे. तसंच या घटनेबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.
थोडक्यात बातम्या-
“नरेंद्र मोदींनी अब्दुल कलाम यांना राष्ट्रपती केलं”
“सकाळी आयसोलेशन, रात्री सेलिब्रेशन…हाच आहे काँग्रेसचा तमाशा”
पेट्रोल भरताना तरूणाने केलं असं काही की…, पाहा व्हिडीओ
हे सरकार दारुडं सरकार आहे- सदाभाऊ खोत
अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांना रिपब्लिकन पक्ष संरक्षण देईल- रामदास आठवले