बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

महिला आरोपी पळण्याच्या प्रयत्नात रेल्वे ट्रॅकवर पडली अन्…; थरारक घटनेचं सीसीटीव्ही फुटेज समोर

मुंबई |  मुंबईमध्ये एक महिला पळण्याच्या नादात रेल्वे ट्रॅकवर पडली. ही घटना मुंबईतील दादर रेल्वे स्टेशनवरील असल्याचं समजत आहे. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दादर रेल्वे प्लॅटफॉर्मवरून एका आरोपी महिलेला पोलीस घेऊन जात होते. तिथून पळून जाण्यासाठी महिलेनं एक युक्ती लढवायचं ठरवलं. 4 नंबर प्लॅटफॉर्मवरून एक रेल्वे समोरून येत होती. त्या महिलेनं हे पाहिल्यानंतर तिने त्या रेल्वेमध्ये चढून पळून जाण्याचा प्लॅन केला. त्यानूसार ती पोलिसांचा हात झटकत पळू लागली.

रल्वेमध्ये चढायच्या नादात ती रल्वे रूळावर पडली. मात्र पोलीस सतर्क असल्यामुळे पोलिसांनी त्या महिलेचा प्राण वाचवला. ही संपूर्ण घटना रेल्वे ट्रॅकवर असलेल्या सीसीटिव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

या व्हिडीओमध्ये रेल्वे ट्रॅकवर गर्दी असून, एक पोलीस एका आरोपी महिलेला घेऊन जात आहेत. काही वेळानंतर ती महिला अचानक पळत असल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे.

पळता पळता त्या महिलेचा तोल गेल्यामुळे ती रेल्वेच्या रूळावर पडते. समोरून एक ट्रेन येत असल्यामुळे पोलीस आपल्या जीवाची पर्वा न करता रूळावर उडी मारतात. त्यानंतर त्या महिलेला रूळाच्या पलिकडे धकलतात. तसेच ती महिला सुखरूप आहे की नाही हे पाहण्यासाठी अनेक लोक त्या ठिकाणी गर्दी करत असल्याचं व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. पोलिसांच्या या सतर्कतेमुळे त्या महिलेचा प्राण वाचला आहे.

पाहा व्हिडीओ-

थोडक्यात बातम्या-

तीन महिन्यांपूर्वी लव्ह मॅरेज, पत्नीने शिवी दिल्याचा राग आला अन् त्याने उचललं टोकाचं पाऊल

“मराठा आरक्षणाच्या हुकूमाची पाने मोदींच्याच हाती, त्यांनीच लक्ष घालावं”

BCCI ची महत्वाची बैठक; IPL 2021 आणि T20 वर्ल्ड कपबाबत होणार मोठा निर्णय 

4 वर्षांच्या चिमुरडीचा हा व्हिडीओ पाहून तुम्हीही कराल तिच्या धैर्याला सलाम, पाहा व्हिडीओ

विवाहित प्रेयसीला मित्रासोबत शरीरसंबध ठेवण्यास केली जबरदस्ती; नकार देताच उचललं धक्कादायक पाऊल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More