बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“मी खूप नशिबवान, कोरोनामुळे माझा जीव वाचला”

नवी दिल्ली | गेल्या दोन वर्षात कोरोनाने थैमान घातलं आहे. कोरोनामुळे गेल्या काही दिवसांमध्ये अनेेकांच्या जीव गेला आहे. त्यानंतर आता लसीकरणास सुरूवात झाली आहे. त्यातच आता एका महिनेने केलेल्या दाव्यामुळे ती महिला सध्या चर्चेचा विषय बनली आहे.

एका महिलेने म्हटलं आहे की, कोरोनामुळे तिचा जीव वाचला आहे. ब्रिटनमध्ये राहणारी महिला जेम्मा फैलूनने म्हटलं आहे की, मी मागील काही दिवसांपासून लाँग कोविडच्या आजारातून जात आहे. त्यामुळे मला इलाजासाठी डाॅक्टराकडे जावं लागलं.

डाॅक्टरांनी मला काही टेस्ट करायला सांगितल्या. त्या टेस्टच्या रिपोर्टमधून मला थाॅयराॅयड आणि किडनीचा कॅन्सर असल्याचं समोर आलं. जर मला कोरोना नसता झाला तर मला माझ्या कॅन्सरबाबत कळलंच नसतं, असं या महिलेने म्हटलं. कॅन्सरबद्दल लवकर कळल्यानं मला लवकर त्यावर मात करता आली, असंही तिने यावेळी म्हटलं आहे.

दरम्यान, मी खूप नशिबवान आहे की कोरोनामुळे माझा जीव वाचला, असं आनंदात ती म्हणाली आहे. काही दिवसांपुर्वी कोरोना लसीकरणामुळे काहीच्या डोळ्याची दृष्टी परत आल्याची देखील बातमी समोर आली होती.

थोडक्यात बातम्या-

…तर मग कर्णधारची गरजच काय?; KKRच्या ‘त्या’ कृतीवर गौतम गंभीर भडकला

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र, म्हणाले…

“शेतकऱ्यांना थोडा फायदा मिळू लागला की भाजपच्या पोटात दुखतं”

शाळा उघडताच कोरोनाचा शिरकाव; 32 विद्यार्थीं कोरोना पाॅझिटिव्ह सापडल्यानं खळबळ

राज्याच्या कोरोना रूग्णांच्या आकडेवारीमध्ये चढ-उतार, जाणून घ्या आजची आकडेवारी!

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More