बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘आम्ही बेडरूममध्ये असायचो तेव्हा…’; शरीरसंबंधाबाबत महिलेने पतीविरोधातच केली पोलिसात तक्रार!

अहमदाबाद | लग्नानंतर प्रत्येक मुलीच्या काही अपेक्षा असतात. त्यापैकी काही पुर्ण राहतात तर काही अपुर्ण. मानवी शरीराची महत्त्वाची गरज म्हणजे शरीरसुख. या शरीरसंबंधामुळे पती-पत्नीमध्ये एक चांगलं नात निर्माण होतं. मात्र काही वेळा शरीरसंबंधामुळे त्यांच्यात वादही होतात. अशातच अहमदाबादमधील एका महिलेने शरीरसुखावरून आपल्या पतीविरोधात तक्रार दाखल केली आहे.

दोन वर्षांपासुन पतीने महिलेला शरीरसुखापासुन वंचित ठेवलं, त्यासोबतच लग्नानंतर माहेरच्यांकडुन हुंड्यासाठी जबरदस्ती केली. लग्नानंतर फक्त दहा दिवस नवऱ्याने शरीरसंबंध ठेवले. तेव्हापासुन आमच्यात काहीच शारीरिक नातं नसल्याचं महिलेने तक्रारीमध्ये म्हटलं आहे.

आम्ही ज्यावेळेस बेडरूममध्ये असायचो तेव्हा मी शरीरसुखाची मागणी केल्यानंतर पती खुप मारहाण करायचा. त्यानंतर तो तिथे थांबत देखील नव्हता, असंही महिलेने सांगितलं आहे. संबंधित महिलेने पतीसह सासु-सासरे यांच्याविरोधात फिर्याद दाखल केली आहे.

कौटुंबिक हिंसाचारा अंतर्गत महिलेने तक्रार दाखल केली आहे. तसेच पतीचे दुसऱ्या महिलेबरोबर शरीरसंबध असल्याचा संशय महिलेने व्यक्त केला आहे. महिलेने पतीच्या त्रासाला कंटाळुन 1 ऑगस्टला घर सोडलं आहे. त्याचबरोबर महिलेने पतीविरोधात काही दावे केले आहेत. पती अत्यंत विचित्र वागायचा असं देखील महीलेने म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

‘शरद पवारांंना ‘तो’ अधिकार नाही कारण…’ ; सुधीर मुनगंटीवारांचा ठाकरे सरकारवर निशाणा

‘…तर मी तुमचा ‘चड्ढा’ उतरवेल’; नवज्योत सिद्धूंवर केलेल्या ‘त्या’ टीकेमुळे राखीचा चढला पारा!

माही मार रहा है! सराव सामन्यातच धोनीने मारले अर्धाडझनभर षटकार, पाहा व्हिडीओ

देवेंद्र फडणवीस अन् जयंत पाटलांचा एकाच गाडीतून प्रवास!

अमरिंदरसिंग यांच्या राजीनाम्यानंतर पंजाबचा ‘कॅप्टन’ कोण?; ही 2 नाव आघाडीवर!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More