बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भाच्याची गाडी अडवल्याने महिला आमदारने लगावली पोलिसाच्या कानशिलात

नवी दिल्ली | सध्या देशातील राजकीय वातावरण तापलेलं असताना राजस्थानच्या बांसवाडा जिल्ह्यात खळबळजनक प्रकार घडला आहे. बांसवाडा जिल्ह्यातील कुशलगाड या भागाच्या आमदार रमिला खरिया यांचा भाचा असणाऱ्या सुनील बारियाची गाडी पोलिसांनी अडवली. भाच्याची गाडी अडवल्याने खरिया यांनी थेट पोलिसाच्याच कानशिलात लगावली आहे.

वाहतूक नियमांचं उल्लंघन केल्याने  कुशालगड भागात पोलिसांंनी सुनिलची गाडी अडवली होती. पोलिसांनी गाडी अडवल्याने सुनिल पोलिसांशी हुज्जत घालू लागला. त्याने पोलिसांची कॉलर पकडून त्यांना नोकरीवरुन काढून टाकण्याची धमकी दिली. यामुळे पोलिसांनी सुनीलवर कारवाई करत त्याला दंड ठोठावला.

या घटनेची माहिती रमिला खरिया यांना समजताच त्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि त्यांनी थेट संबंधित कॉन्स्टेबलच्या कानाखाली लगावली. यानंतर स्टेशन प्रभारी यांनी रमिला खरिया यांना संबंधित कॉन्स्टेबलची माफी मागण्यास सांगितले. मात्र, त्यांनी माफी मागण्यास नकार दिला. यामुळे सर्व पोलीस संबंधित कॉन्स्टेबलसोबत उभे राहिले आणि जेवण नाकारत संपावर गेले.

दरम्यान महिला आमदार रमिला यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच सुनील बारिया विरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमदारांविरोधातील तक्रारीचा तपास सीबीआय करते. यामुळे हे प्रकरण सध्या सीबीआयकडे सोपवण्यात आलं आहे.

थोडक्यात बातम्या – 

‘सगळं काही मॅनेज झालं असं….’; अजित पवारांच्या त्या फोन कॉलबाबत संभाराजेंनी केला गौप्यस्फोट

“शिवसेना कुणाच्या इशाऱ्यावर नाचते हे जगाला ठाऊक पण रामकार्यात तंगड घालाल तर…”

छत्रपती शिवाजी महाराजांच्या दुर्मिळ चित्रांचा शोध; तीन शिवकालिन चित्र परदेशातील संग्रहालयात

“संभाजीराजे राज्य सरकारचा प्रतिनिधी म्हणून मी आमंत्रण देतो, तुम्ही उद्याच मुंबईला या!”

‘…त्यामुळे उच्च न्यायालयाने मराठा आरक्षण नाकारलं’; हसन मुश्रीफ यांची कोल्हापूरात कबुली

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More