बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

महिला म्हणाली, “शाहरुखला भेटूनही इतका आनंद झाला नाही!; मोदींचं स्मितहास्य…

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बैठकीत नुकताच 12 वीच्या परीक्षांबाबत मोठा निर्णय घेतला. या बैठकीत सीबीएससी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. परीक्षा रद्द केल्यानंतर विद्यार्थ्यांची मत जाणून घेण्यासाठी पंतप्रधान मोदींनी अचानकपणे मुलांच्या बैठकीत भाग घेतला आणि त्यांच्याशी चर्चा केली. त्यावेळी एका पालक महिलेनं केलेल्या वक्तव्यावर मोदींना मनातल्या मनात हसू आलं.

पंतप्रधान मोदी विद्यार्थ्यांशी संवाद साधत होते. तेव्हा आपला मुलगा पंतप्रधांनांशी संवाद साधत आहे, हे कळाल्यावर त्या ठिकाणी पालक देखील पाहायला आले. मोदींना पालक व्हिडीओ काॅलमध्ये दिसताच त्यांनी पालकांशी देखील चर्चा केली. खुद्द देशाचे पंतप्रधान आपल्या मुलांशी बोलत आहे, त्यामुळे त्यांना देखील खूप आनंद झाला. या संवादादरम्यान, एका महिला पालक म्हणाली, अभिनेता शाहरुख खानला भेटूनही इतका आनंद झाला नव्हता, जेवढा तुम्हाला भेटून झाला आहे, या महिलेच्या आनंदावर मोदींनी स्मितहास्य केलं.

पालकांशी संवाद झाल्यानंतर ते विद्यार्थ्यांना म्हणाले, तुम्ही माझ्याशी बोलताना अडखळला नाहीत. तुम्ही जसे आई-वडील वा शिक्षकांशी बोलता तसेच माझ्याशी बोललात. याचा मला आनंदच आहे, असं मोदी विद्यार्थ्यांना म्हणाले. मोदींशी संवाद झाल्यानं विद्यार्थी देखील खुश होते.

दरम्यान, मुलांशी संवाद साधताना त्यांनी कोरोनाच्या जागरूकतेविषयी आढावा घेतला. काही लोकं स्वतःला पैलवान समजतात, त्यांना मास्कची गरज वाटत नाही, असं मोदी म्हणाले. त्यावर मुलांनी लगेच उत्तर दिलं,  सरकार तसेच अनेक लोक कोरोना प्रोटोकॉलबाबत जागरूकता करत आहेत, असं उत्तर मुलांनी दिलं.

थोडक्यात बातम्या-

छत्रपती घराण्याचं काम लोकांना पेटवण्याचं नाही, तर न्याय देण्याचं- खासदार संभाजीराजे

“टॅापर्स नेहमीच अव्वल राहतात”; मोदींच्या प्रश्नाला विद्यार्थ्यांचं भन्नाट उत्तर

सरकारवर टीका केली म्हणून राजद्रोहाचा खटला भरता येणार नाही; विनोद दुआंवरील गुन्हा रद्दबातल

प्रियकराचं लग्न ठरलं, ढोल-ताशा घेऊन दारात आलेल्या प्रेयसीनं केला भलताच ड्रामा

75 वर्षीय सासऱ्याला कोरोनाची लागण, सुनेनं पाठीवर उचलून दवाखान्यात नेलं!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More