बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…म्हणून महिलेने तुरूंगात असलेल्या पतीसोबत शरीरसंबंध ठेवण्यासाठी न्यायालयात मागितली परवानगी!

हरियाणा | हरियाणामधील गरुग्राम कोर्टाने एका आरोपीला हत्या आणि इतर गुन्ह्यांमध्ये दोषी ठरवून त्याला भोंडसी जिल्ह्यात तुरुंगात टाकलं आहे. 2018 साली या आरोपीला तुरुंगवासाची शिक्षा सुनवण्यात आली होती. यादरम्यान या आरोपीच्या पत्नीने तिच्या पतीसोबत शरीरसंबंध ठेवण्यासाठी कोर्टाकडून परवानगी मागितली आहे.

या महिलेला तिचा वंशज वाढवण्यासाठी मुल हवं आहे. यामुळे या महिलेला तिच्या पतीसोबत शारीरक संबंध ठेवायचे आहेत. यासाठी या महिलेने हरियाणातील हायकोर्टाकडे याचिका दाखल केली आहे. ही याचिका दाखल करत असताना महिलेने तुरुंगात असलेल्या व्यक्तीला वंशज वाढवण्यापासून रोखलं जाऊ शकतं नाही, असं म्हटलं आहे.

महिलेने दिलेल्या याचिकावर हायकोर्टाने गृहविभागाकडून उत्तर मागितलं. यादरम्यान महिलेच्या वकीलाने दिलेल्या महितीनुसार मानवाधिकारांनुसार महिलेला वंशवृद्धीचा अधिकार आहे. एवढचं नाही तर संविधानाच्या आर्टिकल 21 नुसार त्यांना जीवन आणि स्वातंत्र्याचा अधिकार आहे, असं देखील त्यांनी स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, जसवीर सिंहच्या केसमध्ये पंजाब सरकारने कैद्दांना वंशवृद्धीसाठी पत्नीसोबत शारीरीकसंबंध ठेवण्यासाठी सांगितलं होतं. याकारणामुळे आता कोर्टाने पंजाब सरकारकडून याबाबत उत्तर मागितलं आहे.

थोडक्यात बातम्या-

मासिक पाळी दरम्यान तरुणीच्या डोळ्यातून वाहू लागलं रक्त, वाचा काय आहे प्रकरण

वडिलांच्या दुसऱ्या विवाहाला मुलगी न्यायालयात आव्हान देऊ शकते- मुंबई उच्च न्यायालय

नात्याला काळीमा फासणारी घटना; पॉर्न पाहून दारुड्या मुलानं आईवर केला लैंगिक अत्याचार

मानवी केसांनी भरलेले 2 ट्रक जवानांनी पकडले, एक किलो केसांची किंमत ऐकून थक्क व्हाल

अब्रू वाचवण्यासाठी माजी मंत्र्यांनी पळपुटेपणा केला- धनंजय मुंडे

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More