बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

इंजेक्शन पाहून लहान मुलासारखी रडायला लागली महिला, व्हिडीओ तुफान व्हायरल

मुंबई | सोशल मीडियावर आपल्याला जगभरातील वेगवेगळे व्हिडीओ पाहायला मिळतात. यातील काही व्हिडीओ आपल्याला चांगली शिकवण देवून जातात तर काही व्हिडीओ आपल्याला खदखदून हसवतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक मजेशीर व्हिडीओ व्हायरल होत आहे.  व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये इंजेक्शन घेणाऱ्या एका महिलेची फजिती मार्मिकपणे दाखवण्यात आली आहे.

व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, एक महिला इंजेक्शन घेण्यासाठी नर्ससमोर बसली आहे. मात्र, ती इंजेक्शन पाहून चांगलीच घाबरली आहे. नर्सच्या हातात इंजेक्शन पाहून ती इंजेक्शन घेण्यास नकार देत आहे. इंजेक्शन घेण्यासाठी महिला नकार देत असल्याने त्या महिलेला नेमकं काय करावं हे समजत नाही.

महिलेचं लक्ष वळवण्यासाठी नर्स तिच्याशी बोलण्याचं नाटक करते. मात्र, भित्र्या महिलेनं उत्तर देण्याआधीच नर्स तिच्या दंडामध्ये इंडेक्शन देते. नर्सने इंजेक्शन देताच ही महिला लहान मुलांसारखे मोठमोठ्याने रडू लागते. हे पाहून आसपासचे लोक महिलेवर हसताना व्हिडीओमध्ये दिसत आहेत.

दरम्यान,  समिंदर सिंग गील नावाच्या व्यक्तीने हा व्हिडीओ फेसबुकवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी लोटपोट होऊन हसत आहेत. हा व्हिडीओ नेमका कुठला आहे, याबाबत अद्याप काहीही माहिती मिळू शकलेली नाही.

पाहा व्हिडीओ –

थोडक्यात बातम्या – 

चुकीला माफी नाही!, शेतकऱ्यांना फसवणाऱ्या कंपन्यांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश

‘…त्या शाखाध्यक्षाच्या घरी स्वत: जेवायला जाणार’; राज ठाकरेंची अनोखी ऑफर

जनतेच्या सेवेत समर्पित, म्हणत राज्यमंत्री झाल्यावर भारती पवार संसदेत जाताना नतमस्तक

मनसे कात टाकतेय; पुण्यातून महत्त्वाची माहिती समोर

मुंबई-पुणेकरांना पाऊस झोडणार, ‘या’ 9 जिल्ह्यांनाही रेड अलर्ट!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More