बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

दैव बलवत्तर! भलंमोठं झाड कोसळल्यानंतरही वाचली महिला; काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडिओ

मुंबई | सध्या मुंबई आणि परिसरामध्ये दोन दिवसांपासून तौक्ते चक्रीवादळाने हाहाकार माजवला आहे. वादळामुळे सोसाट्याचा वारा वाहत असून अनेक झाडं उन्मळून पडत असल्याच्या घटना पाहायला मिळत आहेत. असाच एक वादळामुळे भलंमोठं झाड पडण्याचा व्हिडीओ मुंबई येथील विक्रोळीमधून समोर आला आहे.

मुंबईत मोठ्या प्रमाणात चक्रीवादळामुळे नुकसान झालं आहे. अनेक ठिकाणी रस्ते खचले आहेत तर काही ठिकाणी झाडांची पडझड झाल्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे. त्यातच एक महिला विक्रोळी येथील पार्कसाईट पोलीस स्टेशन समोरून छत्री घेऊन जात असताना अचानक एक झाड कोसळलं.

या महिलेचं दैव बलवत्तर म्हणून झाड कोसळल्यानंतरही थोडक्यात ही महिला सतर्क झाल्यामुळे वाचली आहे. दरम्यान, ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्यामुळे या महिलेच्या सतर्कतेमुळे तिचा प्राण कसा वाचला हे समोर आलं आहे. या व्हिडिओमध्ये सदरील महिला छत्री घेऊन जात असताना अचानक तिथे सोसाट्याचा वारा वाहू लागतो आणि एक भलंमोठं झाड उन्मळून पडतं.

त्याच वेळेला या महिलेचं लक्ष त्या पडणाऱ्या झाडाकडे गेल्यामुळे ती लगेच पळायला लागते आणि ते झाड तिच्या अगदी जवळच पडतं. पण सुदैवाने या महिलेचं लक्ष असल्यामुळे ते झाड तिच्यापासून किंचित अंतरावर पडतं आणि या महिलेचा जीव वाचतो. काळजाचा ठोका चुकवणारा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर ‘देव तारी त्याला कोण मारी’ या म्हणीचा प्रत्यय आल्याचं पाहायला मिळतंय.

पाहा व्हिडिओ –

थोडक्यात बातम्या –

तौक्ते चक्रीवादळामुळे तब्बल 93 जण झाले बेपत्ता; युद्धपातळीवर शोधमोहीम सुरू

नितीन गडकरींनी मोदी सरकारला दिला घरचा सल्ला, म्हणाले…

तुमचं SBI बँकेमध्ये काम आहे?, तर ही बातमी नक्की वाचा; बँकेने लागू केले नवीन नियम

लाॅकडाऊनमध्ये नोकरी गेल्यानंतर मुली लागल्या वेश्याव्यवसायाला, धक्कादायक प्रकार आला समोर

टुलकिट प्रकरणावरून केंद्रात भाजप-काँग्रेस आमनेसामने; वाचा काय आहे नेमकं प्रकरण

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More