बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

महिलेवर 11 जणांनी केला बलात्कार, त्यानंतर समोर आली धक्कादायक माहिती

रांची | देशात दिवसेंदिवस महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. अशात देशाला हादरवून सोडणारी एक घटना समोर आली आहे. झारखांडमधील पाकूड येथे 11 जणांनी मिळून एका 25 वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

पाकडू येथे संबंधित महिला शौचास जात असताना अचानक तिचं अपहरण करण्यात आलं. अपहरण केल्यानंतर आरोपींनी तिला दूर झाडींमध्ये नेलं. त्यानंतर तिच्यावर बलात्कार करण्यात आला. एवढंच नाही तर बलात्कार केल्यानंतर आरोपींनी त्यांच्या काही नातेवाईकांना बोलावून घेतलं. आरोपींच्या नातेवाईकांनीही घटनास्थळी येऊन संबंधित महिलेचं लैंगिक शोषण केलं.

11 जणांनी मिळून महिलेवर रात्रभर बलात्कार केला आणि सकाळ होताच सगळे फरार झाले. यादरम्यान महिला बेशुद्ध झाली होती. सकाळी शुद्ध आल्यानंतर महिला कशीतरी घरी पोहोचली. यानंतर महिलेला रूग्णालयात नेण्यात आलं. प्रकृती बरी झाल्यानंतर संबंधित महिलेनं मुफस्सिल पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदवली.

दरम्यान, घटनेतील एकूण 11 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. मात्र तपासादरम्यान अत्यंत धक्कादायक बाब समोर आली. संबंधित आरोपींपैकी काही आरोपी हे महिलेचे नातेवाईक असल्याचं समोर आलं आहे. तसेच या सर्वांना महिला सायंकाळी शौचास जात असल्याचं माहित असल्याने हा बलात्कार ठरवून करण्यात आला होता.

थोडक्यात बातम्या-

पुण्यात नग्न अवस्थेतील मृतदेह आढळल्याने एकच खळबळ

“बनावट रेमडेसिवीर प्रकरणात राष्ट्रवादीचा कार्यकर्ता”; भाजप आमदाराच्या ट्विटनं खळबळ

‘तो दारु पिऊन दिवसभर वावरात पडलेला असतो’; भाजपच्या ‘या’ आमदारावर गायकवाडांची टीका

घरातून येत होता कुजलेला वास, दरवाजा तोडताच समोर दिसला धक्कादायक प्रकार

“अरे ओ बेटा जी…”; ….म्हणून सेहवागनं प्रिती झिंटाला केलं ट्रोल

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More