बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

संतापजनक! ICU मध्ये व्हेंटिलेटरवर असलेल्या महिलेवर वॉर्ड बॉयने केला बलात्कार!

जयपूर | वॉर्ड बॉयने रूग्णालयातील आयसीयुमध्ये असेलेल्या महिलेवर रात्रभर बलात्कार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. यावेळी पीडित महिला व्हेंटिलेटरवर होती, तसेच तिच्या तोंडाला मास्क लावण्यात आला होता. त्यामुळे ती ओरडूही शकली नाही. ही घटना राजस्थानातील जयपूर याठिकाणी घडली आहे.

आरोपीने बेशुद्धावस्थेत असणाऱ्या या महिलेवर रात्रभर हा घृणास्पद प्रकार केला आहे. सबंधित घटना सोमवारी रात्री घडली असून याप्रकरणी पोलिसांनी आरोपी खुशीराम गुर्जर याला अटक केली आहे. या घटनेचं गांभीर्य लक्षात घेवून पोलीस पुढील तपास करत आहेत.

सकाळ झाल्यानंतर महिलेनं तिच्यासोबत घडलेला प्रकार आपल्या पतीला सांगण्याचा प्रयत्न केला. पण तिला व्यवस्थित सांगता येतं नव्हतं. त्यामुळे पीडितेच्या पतीनं पेन आणि कागद दिला, तेव्हा पीडित महिलेनं तिच्यासोबत घडलेला सर्व प्रकार लिहून सांगितला.

महिलेच्या पतीने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. तक्रार दाखल होताच पोलिसांनी नाडौटी करौली येथील रहिवासी असलेल्या खुशीराम गुर्जरला अटक केली आहे. या प्रकरणाचा पोलिस तपास करत आहे.

थोडक्यात बातम्या-

कोरोनामुळे ‘या’ राज्यातून महाराष्ट्रात जाण्या-येण्यावर निर्बंध; बससेवा केली बंद

मुंबईकरांनी भारतीय संघाला सावरलं, अटीतटीच्या सामन्यात भारताचा इग्लंडवर विजय

“युपीएचं पुनर्गठन करा, सोनियांच्या जागी शरद पवार यांना अध्यक्षपदी बसवा”

शेतकरी आंदोलनातील शेतकऱ्यांना कोरोनाची लस द्यावी- राकेश टिकैत

पुण्यात लुटमारीसाठी दुकानदारावर गोळीबार; पोलिसांनी रचला सापळा आणि…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More