बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मुंबईत महिलेचा मृतदेह आढळला, अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या केल्यानं खळबळ

मुंबई | मुंबईतील वांद्रे-कुर्ला कॉम्पलेक्स येथे एमटीएनएल जंक्शनजवळ मंगळवारी एका महिलेचा मृतदेह आढळून आला. हा मृतदेह सर्वप्रथम परिसरातील स्थानिकांना एका नाल्यात आढळून आला. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहेे. या प्रकरणाचा तपास केल्यानंतर अत्यंत धक्कादायक बाब समोर आली आहे.

महिलेच्या मृतदेहाची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी पोहोचताच पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला. तसेच मृतदेहाची पाहणी केल्यानंतर मृत झालेल्या महिलेच्या गळ्यावर जखम अढळून आली. त्यानंतर वैद्यकीय तपासात धक्कादायक खुलासा झाला.

संबंधित महिलेचा खून करण्यापुर्वी आरोपीने महिलेचा बलात्कार देखील केला असल्याचं समोर आलं आहे. महिलेच्या गुप्तांगमध्ये अनेक जखमा अढळून आल्या. यानंतर महिलेची ओळख शोधण्याचा प्रयत्न पोलीस करत असून अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, याबाबतची कोणतीच माहिती समोर आली नसून पोलिसांनी परिसरातील इतर ठिकाणचे सीसीटीव्ही कॅमेरे तपासणं सुरु ठेवलं आहे. दरम्यान पोलिसांनी आरोपी हा एकतर प्रियकर असावा किंवा आर्थिक अडचणीतून महिलेचा खून करण्यात आला असावा, अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

थोडक्यात बातम्या-

“देशात फक्त तीनच कंपन्यांना परवानगी असताना नागरिकांना ‘ती’ लस कशी दिली जाते”

धक्कादायक! केवळ ओरल सेक्सने 15 वर्षांची मुलगी झाली गर्भवती; घडला ‘हा’ प्रकार

“वकिलाला दररोज अडीच लाख रुपये; राज्य सरकार कोणाचे हित जपत आहे?”

खूशखबर! उद्या केंद्र सरकारतर्फे 19 हजार कोटी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात होणार जमा

‘या’ रक्तगटातील लोकांना कोरोनाचा धोका अधिक; CSIR च्या संशोधनातून खुलासा

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More