बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मास्क न घातल्यामुळे महिलेला पोलीस ठाण्यात नेऊन तिच्यासोबत केलं ‘हे’ धक्कादायक कृत्य

लंडन | कोरोनाने जगभरात थैमान घातलं आहे. अशातच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिलेनं मास्क न घातल्यानं तिला एक भलतीच शिक्षा दिली असल्याचं समोर आलं आहे. महिलेला कपडे काढण्यास सांगून पोलिसांनी त्यांच्या अधिकारांचा गैरवापर केला असल्याचं दिसून आलं.

कोरोनाचा धोका लक्षात घेता इंग्लंडमध्येही मास्क घालणं अनिवार्य करण्यात आलं आहे. मात्र एका महिलेनं तिच्या काही शारिरीक समस्यांमुळे मास्क घातला नव्हता. ज्युलिएट जॉन्सन वेटरोज असं त्या महिलेचं नाव असून ती शाॅपिंगसाठी सुपरमार्केटमध्ये गेली होती. तेथील सेक्युरीटी गार्डनने त्यांना मास्क न घातल्यामुळे टोकलं तेव्हा त्यांनी त्यांचा आरोग्यविषयक गंभीर समस्या असल्याचं सांगत म्हणून मास्क लावलं नाही, असं सांगितलं.

एवढंच नाहीतर त्या महिलेनं दुकांनाच्या मॅनेजरलाही डाॅक्टरांचे पेपर दाखवले मात्र त्यांनी पोलिसांना बोलवलं. पोलिसांनी महिलेला अटक केलं त्यानंतर पोलीस कोठडीत घेऊन जात तिथे उपस्थित महिला पोलिसांनी या महिलेवर जबरदस्ती करत आपले पूर्ण कपडे काढण्यास सांगतिलं. पीडित महिलेला समजलंच नाही की अशा वेळेत काय करावं. मात्र पोलिसांच्या चेहऱ्यावरील राग पाहून तिनं आपले सगळे कपडे काढले. त्यानंतर जेलमधून सुटल्यानंतर तिनं पोलिसांत तक्रार दाखल केली आणि पोलिसांनी आपल्या अधिकारांचा चुकीचा वापर केल्याचा आरोप केला.

दरम्यान, कोरोनानं जगभरात हाहाकार माजवला आहे. त्यामुळे जगात सगळीकडे कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी काही निर्बंध घालून दिले आहेत त्याचं काटेकोरपणे पालन करणं सक्तीचं असल्याचं सरकारकडून वारंवार सांगितलं जातयं. मात्र काही जण या नियमांचं पालन करत नसल्याचं दिसून येतं. त्यामुळे अशा लोकांना कठोर शिक्षा दिली जात असल्याचं आढळून आलं आहे.

थोडक्यात बातम्या – 

आयकर विभागाने घेतले हे तीन मोठे निर्णय, वाचा काय आहेत?

बाॅयफ्रेंडने गर्लफ्रेंडसाठी बनवले अजब नियम, वाचून तुम्हालाही बसेल धक्का!

एटीएस आणि क्राईम ब्रांचची मोठी कारवाई; जोगेश्वरीतून एक संशयित दहशतवादी ताब्यात

कोरोना झाल्यावर कर्मचाऱ्यांना मिळणार ‘एवढ्या’ दिवसांची सुट्टी, सरकारनं घेतला मोठा निर्णय!

“मोदींचा चेहरा नसेल तर नाचरे मुखवटे नगरपालिका निवडणुकांतही पराभूत होतील”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More