बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

नवऱ्याने अन् घरातल्यांनी साथ सोडली, 6 महिन्याच्या मुलासह घराबाहेर पडलेली महिला बनली पोलीस उपनिरीक्षक

नवी दिल्ली | अनेक वेळा आपण महिलांच्या प्रेरणादायी कहाण्या ऐकतो. अशातच आता एका महिलेच्या कहाणीने सर्वांच्या डोळ्यात पाणी आणलं आहे. संबंधित महिलेच्या पतीने सोडून दिल्यानंतर तिच्या माहेरच्यांनी देखील तिची साथ सोडली. यामुळे आपल्या सहा महिन्यांच्या बाळासोबत ही महिला एकटीच राहू लागली आणि आता ती एसआय बनली आहे.

या महिलेचं नाव एनि शिवा एसं आहे. आपल्या परिवारच्या विरोधात जाऊन एनि यांना लग्न केलं होतं. एका मुलाला जन्म दिल्यानंतर पतीने त्यांना सोडलं. पतीने सोडल्यामुळे त्या अवघ्या 6 महिन्यांच्या मुलाला घेवून माहेरी आल्या. तेव्हा त्यांच्या घरच्यांनी त्यांनी स्वीकारलं नाही. कुटुंबाने एनी शिवा आणि त्यांच्या 6 महिन्यांच्या मुलाला घराबाहेर काढलं. घरा बाहेर काढल्यानंतर एनी शिवा त्यांच्या मुलासोबत आजीच्या घरामागे असलेल्या एक झोपडीत राहू लागल्या.

स्वतःचा आणि आपल्या मुलाचा सांभाळ करण्यासाठी अनेक लहान मोठी कामे केली. यादरम्यान तिनं आईस्क्रीम आणि लिंबू पाणीही विकलं, डोर-टू-डोर डिलिव्हरी देण्याची कामेही केली आणि हँडीक्राफ्टची विक्रीही केली.अॅनी यांच्या एका नातेवाईकानं त्यांना पोलीस अधिकाऱ्याची सेवा बाजवण्यासाठी प्रोत्साहित केलं. तसंच सोबत सब इन्स्पेक्टरची परीक्षा देण्यासही सांगितलं. त्यांनी परीक्षेची तयारी करण्यासाठी काही पैसेही दिले. 2016 मध्ये त्यांना यश मिळालं आणि त्या पोलीस अधिकारी झाल्या.

दरम्यान, तीन वर्षांनंतर त्यांनी सब इन्स्पॅक्टरची परीक्षाही उत्तीर्ण केलं आणि दीड वर्षांच्या ट्रेनिंगनंतर त्या शनिवारी वर्कला पोलीस स्थानकात प्रोबेशनरी सब-इन्स्पॅक्टर म्हणून रुजू झाल्या. आपल्या यशाबाबत बोलताना एनी म्हणाल्या की “माझं पोस्टिंग काही दिवसांपूर्वी वरकला पोलीस स्टेशनमध्ये झाल्याचं मला कळलं. ही अशी जागा आहे, जिथे मी माझ्या लहान मुलासह कित्येकदा अश्रू ढाळले आणि मला पाठिंबा देणारं कोणीही नव्हतं.”

थोडक्यात बातम्या-

“सर्वकाही सुरळीत आणि मनाप्रमाणे होईल, पण देवेंद्र फडणवीस संन्यास घेऊ नका”

“आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून ही संजय राऊतांची सवय”

महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागात तणावाचं वातावरण; शिवसैनिक-कर्नाटक पोलीस आमने सामने

“भाजपचे नेतेच ओबीसी आरक्षणाचे खरे मारेकरी, भाजपचं हे ढोंगी राजकारण”

‘या’ तारखेपासून महाविद्यालयीन शैक्षणिक वर्ष सुरू, लवकरच निर्णय जाहीर करणार- उदय सामंत 

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More