बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

तालिबानच्या तावडीतून वाचली महिला, सांगितली आपबिती काळजाचा थरकाप उडवणारी

काबुल | तालिबाननं अफगाणिस्तानवर वर्चस्व मिळवलं आहे. त्यामुळे तेथील अनेक नागरिक देश सोडण्याचा प्रयत्न करत आहेत. तालिबाननं पूर्वी जेव्हा सत्तेत होते तेव्हा त्यांनी महिलांना फक्त नोकरी आणि शिक्षणापासून वंचित ठेवलं नाही तर घराबाहेर पडण्यावर देखील सक्ती केली. महिला फक्त पुरूषांसोबत बाहेर फिरू शकतील असा नियम तालिबाननं काढला होता. अफगाणिस्तानमध्ये पुन्हा तालिबानची सत्ता आल्यामुळे देश सोडण्यासाठी नागरिक देश सोडण्याच्या प्रयत्नात आहेत.

अफगाणिस्तान येथील महिला त्यांच्या अधिकारांसाठी चिंतीत आहेत. तालिबाननं आता महिलांचे कायदे आणि नियम बदलण्याची भूमिका दर्शवली आहे. अशातच तालिबानच्या हल्ल्यातून जीव वाचलेल्या खतेरानं तिच्यावर झालेली आपबिती सांगितली आहे.

गेल्या वर्षी तालिबानच्या दहशतवाद्यांनी 33 वर्षीय खतेरा यांना गोळी मारण्यात आली होती. या हल्ल्यात त्या कशाबशा जीवंत वाचल्या. तालिबानच्या हल्ल्यातून वाचलेल्या खतेरा यांनी सांगितलं की, तालिबानी शिक्षेत महिलांना मारून कुत्र्यांना खाऊ घातलं जातं. तालिबान महिलांसोबत अतिशय क्रुरपणं वागतं. मी नशीबवान आहे, की मी यापासून वाचले. तालिबानच्या दृष्टीनं, महिला केवळ मासाचा पुतळा आहे, ज्यांच्यात जीव नाही, त्यांना केवळ मारहाण केली जाते.

दरम्यान, गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात त्या गर्भवती असतानाच तालिबाननं त्यांना प्रचंड मारहाण केली होती. खतेरा सांगितलं की, हल्ल्यानंतर त्यांचे डोळे काढण्यात आले. या हल्ल्यात त्यांना आठ गोळ्या लागल्या होत्या. इतंकच नाही, तर त्यांच्यावर चाकूनंही वार करण्यात आले होते. यानंतर त्या बेशुद्ध झाल्यानंतर त्यांच्या डोळ्यावर चाकूने वार केले आणि त्यांना मरण्यासाठी सोडून दिलं होतं.

थोडक्यात बातम्या – 

टी-20 स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर, पाकिस्तानविरुद्ध रंगणार पहिला सामना, पाहा व्हिडीओ

अफगाणिस्तान तालिबान्यांकडे जाताच भारताला मोठा धक्का, ‘या’ गोष्टीवर निर्बंध!

पाकिस्तानने मागितली माधुरी दीक्षित, ‘शेरशहा’च्या उत्तरानं शत्रू देखील हादरले!

अफगाणिस्तानात शरिया कायदा लागू होणार, महिलांवर कोणती बंधनं येणार?, वाचा…

अफगाणिस्तानच्या राष्ट्राध्यक्षाचा नवा खळबळजनक खुलासा, “माझ्याकडे चप्पल…”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More